Home ताज्या घटना गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत गणवेश घालून नाचणा-या पोलीसांना ‘तंबी’

गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत गणवेश घालून नाचणा-या पोलीसांना ‘तंबी’

78

गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत गणवेश घालून नाचणा-या पोलीसांना ‘तंबी’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: राज्यभरात नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जनात पोलीसांच्या ‘या’ कृत्याने पोलीस यंत्रणेलाच धक्का बसलाय. दरम्यान गणवेश घालून नाचलेल्या पोलिसांना खडसावले, अतिरिक्त पाेलिस महासंचालकांचा अधिकाऱ्यांना इशारा.

गणेशाेत्सवात विसर्जनाच्यावेळी ढाेल ताशाच्या तालावर नृत्य करणाऱ्या पाेलिसांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला हाेता. या पाेलिसांना नाचताना बघून अनेकांनी आनंदही व्यक्त केला हाेता. परंतु हे नाचणे पाेलिस कर्मचाऱ्यांना महागात पडलेले दिसत आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी पोलिसांना गणवेशात नाचू नका, असा इशारा दिला आहे, या कृतीला त्यांनी ‘अनादर’ असही म्हटलं आहे.

गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्रभरातील पोलिसांच्या ५० पेक्षा जास्त क्लिप सोशल मीडियावर समोर आल्या आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये माटुंगा येथील जीएसबी सेवा मंडळात महिलांसह डझनभर खाकी कपडे घातलेले अधिकारी नाचताना दिसल्यानंतर मुंबई पोलिसांच्या डीसीपी झोन ४ यांनी विभागीय चौकशी सुरू केली असल्याचं म्हटल्या जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओंपैकी एक म्हणजे दोन पोलिस लालबाग येथे उत्सव करणाऱ्यांच्या खांद्यावर बसलेले दिसतात आणि दुसऱ्यामध्ये ५० पेक्षा जास्त पाेलिस कोल्हापूर पोलिस बंदोबस्तावर असलेल्या ट्रॅकवर जोरदार ठेका धरून नाचत असल्याचे दिसत आहे. “पोलिस अधिकाऱ्यांनी गणवेशात नाचू नये आणि त्यांना तसे करण्याची परवानगी नाही. या प्रकरणाची राज्यभर विभागीय चौकशी सुरू आहे.गणवेशात नाचणे अनादर करणारे आणि अस्वीकार्य असल्याचं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने पोलीस यंत्रणेस ‘तंबी’ देत सांगितलं.