वेदांता प्रकल्पावरून काँग्रेस पक्षाचा आरोप

वेदांता प्रकल्पावरून काँग्रेस पक्षाचा आरोप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_वेदांत प्रकल्प हा गुजरातला रिटर्न भेट समजायची का..?; अतुल लोंढे_

ज्ञानेश्वर पवार, नागपूर

नागपूर : वेदांत प्रकल्पावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले असून त्याच अनुषंगाने काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत वेदांता प्रकल्प कशा पद्धतीने गुजरातला गेला या संदर्भातल्या काही पुराव्याचा हवाला देत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

या प्रकल्पाचा मुद्दा हा राजकरण करायचं नाही; तर हा मुद्दा राज्यातील बेरोजगार तरुणांच्या भविष्याचा आहे, १५जुलै रोजी मुख्य साचिव यांच्या अध्यक्षतेखाली हायापॉवर कमिटीची बैठक झाली होती ती बैठक हा प्रकल्प गुजरात नेण्यासाठी घेण्यात आली होती का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यामध्ये मूळ गुंतवणूक 22 टक्के, इलेक्ट्रिसिटी बिल वीस वर्षापर्यंत तीन रुपये, आणि पाण्याचे सवलतीचे दर वीस वर्षांपर्यंत आणि ईतर युटिलिटी सरकार भरणार होती. अशी जवळजवळ कॅपिटल सबसिडी डिस्प्ले साठी 35 हजार कोटी महाराष्ट्र सरकार भरणार होती. अशा विविध सुविधा आम्हीं उपलब्ध करून देण्यासाठी तयार होतो तरी तुमच्या काळात हा प्रकल्प गुजरात ला जाणे म्हणजे तुमचे सरकार गुजरात गुवाहाटी मध्ये स्थापन झालं म्हणून त्यांना वेदांत प्रकल्प हा रिटर्न भेट समजायची का..? असा खोचक टोलाही लोंढे यांनी राज्य सरकारला लगावला.

आमच्या सरकारच्याकाळात सगळ्या फिजिबिलिटी राज्य सरकारच्या फेवर मध्ये असल्यावरही हे प्रकल्प गुजरातला ओरबडून नेण्याचं काम हे काम चाललय असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles