Home गावगप्पा नागपुरात खुनी थरार; महाविद्यालयीन तरूणांच्या वादाचे हत्येत रूपांतर

नागपुरात खुनी थरार; महाविद्यालयीन तरूणांच्या वादाचे हत्येत रूपांतर

251

नागपुरात खुनी थरार; महाविद्यालयीन तरूणांच्या वादाचे हत्येत रूपांतर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर- रायसोनी कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांची युवकांच्या गटाने हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. तर या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. हर्ष डांगे असे मृत्यू झालेल्या बावीस वर्षीय विद्यार्थ्यांचे नाव आहे. पावणे तीन वाजताच्या सुमारास घटना घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. गिट्टीखदान पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहे. सेमीनेरी हिल्स रोड बालउद्यानाजवळ हत्या झाल्याची पोलिसांनी माहिती दिली.

आपापसात वाद झाल्याने एका विद्यार्थ्यावर धारधार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. हर्ष दांडगे वय 22 मृतकाचे नाव असून ,वाडी या परिसरातील राहणारा आहे. त्याचा मित्र सानिकेत कसार जखमी असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दीपांशू पंडित (वय २० रा. अजनी) असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून तो रायसोनी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. हर्ष गोवर्धन डांगे (वय २२ रा. साईनगर, वाडी) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो वाडी परिसरात असलेल्या मॉडर्न कॉलेजमध्ये शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपांशू याचे महाविद्यालयातील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी भांडण झाले. ही बाब माजी विद्यार्थी असलेल्या अंकित कासार (रा.एमआयडीसी) याला कळली. त्यामुळे दीपांशूला दम देण्यासाठी आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास अंकित कासार आणि हर्ष त्यांच्या काही मित्रांसह रायसोनी महाविद्यालयात गेले होते.

यावेळी अंकित याने दीपांशूला सिनियरला मारशील का? असे म्हणत दोन चार झापड मारल्या. यावेळी दोघांचेही भांडण झाले. ते भांडण मिटल्यानंतर अंकित आणि हर्ष त्यांच्या मित्रासोबत निघून गेले. दरम्यान सेमिनरी हिल्स येथील चहाच्या टपरीजवळ ते बसून आपसात चर्चा करीत होते. दरम्यान हर्ष आणि त्याचा मित्र अंकित कासार (रा.एमआयडीसी) आणि इतर काही मित्र होते. यावेळी दीपांशू आणि त्याच्या साथीदारांनी हर्ष आणि त्याचा साथीदारांना घेरले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचे काही मित्र पळून गेले. काही वेळातच दीपांशू आणि त्याच्या मित्रांनी धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. हर्षच्या पोटात तर अनिकेतला मांडीला दुखापत झाली. हर्ष आणि अनिकेत यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवून हल्लेखोरांनी पळ काढला.

प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्षचा जागेवरच मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविला. यावेळी अंकीतला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे फिरवत दीपांशूसह आठ जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

*आमच्या मित्राला वाचवा*

सेमिनरी हिल्स परिसरात एकीकडे दीपांशू आणि त्याचे साथीदार हर्षला बेदम मारहाण करीत असताना काही मित्रांनी परिसरातील गुन्हे शाखेचे कार्यालयात धावत जाऊन त्यांना प्रकरणाची माहिती दिली. यावेळी आमच्या मित्राला वाचवा अशी ओरड त्यांनी केली. त्यातून पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस पोहचपर्यंत हर्ष रक्ताच्या थारोळ्यात होता आणि त्याच्या मृत्यू झाला होता.

*आरोपीने मित्रांना घेतले बोलावून*

दीपांशू हा राग डोक्यात ठेऊन त्याने आपल्या काही मित्रांना एकत्र केले. यावेळी त्याला अंकित सेमिनरी हिल्स परिसरात आपल्या मित्रासह असल्याची माहिती मिळाली. तिथे दीपांशू याचे एसएफएस महाविद्यालयातील काही मित्र होते. त्यांना संपर्क साधून त्याने त्यांना बोलावून घेतले. याशिवाय आपल्या परिसरातील मित्र असे सात ते आठ जणांना बोलावून घेतले होते.