
न्यू मून विद्यालयात स्वच्छ भारत मिशन अभियानास प्रारंभ
तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया: येत्या गांधी जयंती निमित्ताने स्वच्छ भारत मिशन हा अभियान जिल्हा परिषद गोंदिया द्वारा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान उपक्रम राबविण्याचे निर्देश आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील न्यू मून इंग्लिश मिडियम विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गावातील स्वच्छता करण्यासाठी जनजागृती रॅली काढली व न्यू मून स्कूल ते बस स्थानकापर्यंत अनेक ठिकाणी गावची साफसफाई केली.
प्लास्टिक बंदी व स्वच्छतेवर भर याविषयी स्वतः नारे लावून समाजात स्वतः परिश्रम करून सर्वांसमोर जागृकतेचा एक आदर्श ठेवला. याप्रसंगी शाळेत प्राचार्य सचिन मेश्राम, प्रा.उंदिरवाडे,प्रा. सौ.तारका रुखमोडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले .
या कार्याला संस्थाध्यक्ष यशवंत परशुरामकर, ओम प्रकाश सिंह पवार उपस्थित होते.श्री. बांडे त्रिवेणी थेर, लीना चचाणे कुंजना बडवाईक, प्रतीक्षा राऊत, हिना लांजेवार यांनी सहकार्य केले.