‘पीएफआय’ने रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट

‘पीएफआय’ने रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संदर्भात आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे. या वर्षी जुलैमध्ये बिहारची राजधानी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट पीएफआयने रचल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार PFI ने मोदींवर हल्ला करण्यासाठी पाटणा येथे प्रशिक्षण शिबिरही आयोजित करून अनेक सदस्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले होते. एवढेच नाही तर अनेकजण वित्तपुरवठ्यासाठी दुसऱ्या देशांच्या संपर्कात होते. मोदींच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात होती. तसेच इतर हल्ल्यांसाठी पीएफआय दहशतवादी मॉड्यूल तयार करत होते.

‘ईडी’ने आणखी एक खुलासा केला आहे. गेल्या काही वर्षांत संस्थेने सुमारे 120 कोटी रुपये उभे केले आहेत. या पैशांचा वापर करून देशभरात दंगली आणि दहशतवादी कारवाया करण्याची योजना होती. एवढेच नाही तर फेब्रुवारी 2020 च्या दिल्ली दंगलीसाठी हिंसा भडकावण्याबरोबरच हा पैसा हाथरसमध्ये दंगल भडकवण्यासाठीही वापरला गेला, अशी माहिती ‘ईडी’ ने दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles