“सरस्वतीचा अपमान म्हणजे गरीबीचा अपमान”; कादंबरीकार विश्वास पाटील

“सरस्वतीचा अपमान म्हणजे गरीबीचा अपमान”; कादंबरीकार विश्वास पाटीलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’माझा आनंद’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न_

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: “सर्वसामान्य गरीब माणसाला विद्येचा व कलेचा आधार असतो. गरीबांकडे लक्ष्मी नसते, पण विद्येच्याच आधारावर ते जगतात, म्हणून सरस्वतीचा अपमान म्हणजे, या देशातील गरीबीचा अपमान आहे. खरे तर आदरणीय सावित्रीबाई फुले सरस्वती पूजक होत्या. त्यांच्या “काव्यफुले” या संग्रहात सरस्वतीची स्तुती करणारी एक कविता लिहीलेली आहे. आपल्याकडे शाळेची सुरवात सरस्वती पूजनाने करण्याची पध्दत आहे, त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले सुध्दा त्यांच्या शाळेत सरस्वती पूजन करीत असत. आणि विशेष म्हणजे स्वतः महात्मा फुले त्यावेळी ऊभे राहत असत. ” असे सांगून प्रसिध्द कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लोकांना इतिहासाचे नीटसे ज्ञान नसते, म्हणून काही वक्तव्ये केली जातात, अशी टीका नाव न घेता छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीच्या फोटोवरून केलेल्या विधानाच्या संदर्भात केली.

या विषयाचा खरपूस समाचार घेताना ते पुढे म्हणाले, “अलीकडे राजकारणी लक्ष्मीच्या प्रेमात असतात, म्हणून त्यांना सरस्वती आवडत नाही, लक्ष्मी म्हणजे खोके आणि सरस्वती म्हणजे डोके ” अशीही पुस्ती त्यांनी पुढे जोडली. मेहता पब्लीशिंग हाऊस आयोजित “माझा आनंद” या अभिनेता प्रसाद ओक लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ‘धर्मवीर’ या लोकनेता आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे.त्या अनुभवावर आधारीत “माझा आनंद” हे पुस्तक मेहता हाऊसने प्रकाशित केले आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा एस.एम.जोशी सभागृहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर “धर्मवीर ” चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता मंगेश देसाई ,सौ. मंजिरी ओक आणि पुस्तकाचे शब्दांकन करणा-या प्रज्ञा पोळ उपस्थित होते. अभिनेता प्रसाद ओक याने ‘धर्मवीर’ चित्रपटाच्यावेळी आलेल्या विविध अनुभवांचे वर्णन केले. मनोगत व्यक्त करताना तो म्हणाला, “माझ्या आजवरच्या अभिनय कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘धर्मवीर’ हा चित्रपट आहे. रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या या सिनेमाच्या पडद्यामागची खरी गोष्ट सुरु होते ‘माझा आनंद’ या पुस्तकात. या भूमिकेचा माझा संपूर्ण प्रवास आणि आव्हानं या सगळ्या अनुभवांचं सार यात सामावलं आहे. लक्ष्मीवर माझा विश्वास आहे पण सरस्वती माझा श्वास आहे. या शब्दात प्रसाद ओक यांनी देवी सरस्वती विषयक आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

चित्रपटाचे निर्माते ‘मंगेश देसाई’ यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले की, “आनंद दिघे ही व्यक्तिरेखा केवळ दिसण्यातून जिवंत न करता ती देहबोलीतून आणि प्रचंड मेहनतीतून साकार करण्यात अभिनेते प्रसाद ओक खरे उतरले आहेत.” “चित्रपटाचे दिग्दर्शन करताना पटकथा कितीही
कितीही उत्तम असली तरी त्यातली मूळ व्यक्तीरेखा साकारण्यासाठी योग्य अभिनेता जोवर मिळत नाही आणि तो ती जबाबदारी समर्थपणे खांद्यावर पेलता येत नाही, त्यादृष्टीने प्रसाद ओक हा समर्थ अभिनेता या भूमिकेसाठी मिळाला” असे मत प्रवीण तरडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

चित्रपटाइतकेच प्रेम या पुस्तकाला मिळेल आणि आनंद दिघे हे व्यक्तीमत्त्व अधिक लोकांपर्यंत पोहोचेल असे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.येत्या ५ ऑक्टोबरला ठाण्यात होणाऱ्या दसरा मेळाव्यात या पुस्तकाचे पुनःप्रकाशन मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ‘उत्सव पुस्तकांचा २०२२’ या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेहता प्रकाशनाचे अखिल मेहता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन योजना यादव यादव यांनी केले. ‘धर्मवीर’ चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच शहरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles