मंजूर झालेला निधी खर्च करा तेव्हा अतिरिक्त नियोजन करता येईल; फडणवीस

मंजूर झालेला निधी खर्च करा तेव्हा अतिरिक्त नियोजन करता येईल; फडणवीस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले निर्देश_

भंडारा: जिल्ह्याच्या विकास कामांसाठी शासनाने जो निधी दिला आहे, त्याचे नियोजन झाले असले तरीही तो निधी फक्त 5 टक्के सुद्धा झालेला नाही. म्हणून नवीन वित्तीय वर्षात निधी वाढवून देता येणार नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना येत्या तीन महिन्यात निधी खर्च करण्याचे निर्देश दिले असल्याचे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस हे भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पहिल्यांदा उपस्थितीत झाले होते. त्यांनी सांगितले की जिल्ह्या साठी मंजूर झालेल्या निधी च्या 95 टक्के नियोजन झाले असले तरीही फक्त 25 टक्के निधी देण्यात आला आहे, यातही आता पर्यंत 5 टक्केच निधी खर्च करण्यात आला आहे. हा निधी जर पूर्ण खर्च झाला नाही तर पुढे निधी वाढवून देता येणार नाही.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन पुढील तीन महिन्यात निधी खर्च करण्याचीच सूचना दिली आहे जेणेकरून निधी चे वाढीव नियोजन करता येईल. याच प्रमाणे जिल्ह्यातील घरकुल करिता केलेले अतिक्रमण हे नियमित करून घरकुल मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles