

जगातील लाखो अनुयायांचे पवित्र श्रद्धास्थान ‘दीक्षाभूमी’
कुणाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वर, कुणाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर, तर कुणाचा दसरा मेळावा भगवान गडावर सर्वांनी आपापले ठरवले असल्याचे विघातक चित्र समाज बघतोय.
परंतु या ठिकाणी येण्यासाठी लोकांना आवाहन करावे लागते, त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्था करावी लागते. येणारे पण निष्ठा दाखवण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी येतात. तर त्यांना आणण्यासाठी लोकप्रतिनिधींना टार्गेट दिले जाते.
पण गेल्या ६५ वर्षांपासून भारतातूनच नव्हे; तर संपूर्ण जगातेन कोणतेही, कसलेही वा कुणाकडूनही आवाहन, आमंत्रण, निमंत्रणे अथवा आग्रह तसेच स्वार्थ, सोय नसताना, कोणत्याही प्रकारची गाड्यांची व्यवस्था नसताना स्वखर्चाने लाखो लोक २ दिवस अगोदर न चुकता दरवर्षी जमा होतात ते पवित्र ठिकाण म्हणजे… #नागपूरची #दीक्षाभूमी…होय दीक्षाभूमीच….!!!
ना राजकारण, ना दिखावा, ना अस्तित्व दाखविण्याची गरज. सर्वकाही स्वयंप्रेरणेने, रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंकलेली ‘धर्म परिवर्तनाची’ लढाई, जगातली सर्वात मोठी धम्म प्रवर्तनाची क्रांती घडवून आणलेल्या महामानवाला केवळ अभिवादन करण्यासाठी हे लाखो लोक येतात व जाताना पुस्तकाच्या रुपात ‘विज्ञानाची शिदोरी’ घेऊन जातात. सर्व वाचकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगल कामना.