न्यू मून शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

न्यू मून शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: अर्जुनी/मोरगाव येथील न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज अर्जुनी/मोर. येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन, जागतिक हस्त स्वच्छता दिन व जागतिक विद्यार्थी दिवस,अंध दिन ग्रामीण महिला दिवस साजरा करण्यात आला.

आपल्या भारताचे राष्ट्रपती थोर वैज्ञानिक व तत्वाचिंतक भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन विद्यालयाचे प्राचार्य श्री सचिन मेश्राम, प्रा.राकेश उंदीरवाडे, प्रा. तारका रुखमोडेे यांच्या हस्ते करून माल्यार्पण करण्यात आले. याचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

पुस्तक म्हणजे आयुष्याचे मार्गदर्शक, विचार प्रगल्भतेत वाढ करणारे ज्ञानाचे भांडार असते.पण हल्ली सोशल नेटवर्किंगमुळे पुस्तक वाचन दुरापास्त झाले आहे. म्हणूनच वाचन संस्कृतीचा ऱ्हास थांबवण्यासाठी व पुस्तकांशी घट्ट मैत्री जोडण्यासाठी विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन वर्गात विद्यार्थ्यांनी केले.

आयुष्य चांगले व निरोगी जगायचे असेल तर स्वच्छता महत्वाची असते. हाताच्या स्वच्छतेपासूनच त्याची सुरुवात होते. यातूनच जागतिक स्तरावर हस्तशुद्धीची मोहीम सुरू झाली याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून शाळेत प्रा. तारका रुखमोडे व प्रा. उंदिरवाडे यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आजार टाळण्यासाठी मार्गदर्शनातून त्याचे महत्व पटवून दिले.व जागतिक हस्तस्वच्छता दिनही साजरा करण्यात आला.

अंध दिनानिमित्त निधी गोळा करून
अंध संस्थेला पाठविण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रमदान करून शालेय परिसर स्वच्छ केला अशा प्रकारे जागतिक विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. मार्गदर्शन माहिती याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सुयोग्य विचारांचे वहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही अवांतर वाचन करून, परिश्रम करून स्वच्छतेचे नियम पाळत सर्व कार्याप्रती असलेली जागरूकता दाखवली. यासाठी संस्थाध्यक्ष यशवंत परशुरामकर, ओमप्रकाशसिंह पवार व सर्व पदाधिकारी प्रा. सचिन मेश्राम प्रा. राकेश उंदिरवाडे, प्रा. तारका रुखमोडे, अध्यापक बांडे, लिना चचाणे,कुंजना बडवाईक,त्रिवेणी थेर, हिना लांजेवार, प्रतीक्षा राऊत या सर्वांच्या परिश्रमी विद्यमाने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles