लातुरात पालक शिक्षक समन्वय अभियानाचा सन्मान

लातुरात पालक शिक्षक समन्वय अभियानाचा सन्मान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मा.नरेश शेळके यांच्या हस्ते साहित्यगंधचे प्रकाशन_

बुलढाणा: मराठीचे शिलेदार संस्था, नागपूरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, शैक्षणिक जीवनगौरव पुरस्कार वितरण व कवी संमेलन हा कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजी विद्यानगरी, लातूर येथे आयोजित करण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जि. प. च्या शिक्षक पालक समन्वय अभियानाची दखल घेण्यात येऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नरेश शेळके यांना आमंत्रित करण्यात आले होते. नरेश शेळके यांनी त्यांच्या जिल्हा परिषद मतदार संघात शिक्षक पालक समन्वय अभियान राबवून ३०० गरीब रुग्णांना मदतीचा हात दिला. हा पॅटर्न आता राज्यभर राबविण्याच्या हालचालीला वेग येणार आहे.

साहित्यगंध दीपोत्सव अंक २०२२ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवमती सविता ठाकरे, प्रदेश अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, सिलवासा तर आ. संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री, डॉ. सुनील गायकवाड, माजी खा. लातूर डॉ. माधवराव गादेकर, माजी प्राचार्य शाहू कॉलेज लातूर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष तसेच साहित्यगंधचे मुख्य संपादक राहुल पाटील हे उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामधून नाविन्यपूर्ण शैक्षणिक चळवळीमध्ये कार्य करणाऱ्या ३३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर ५ मान्यवरांना शैक्षणिक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बुलढाण्यात राबविलेल्या व ‘यशदा’ पुणे सारख्या राज्य शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेने दखल घेतलेल्या ‘शिक्षक पालक समन्वय अभियान’ या उपक्रमाचे सादरीकरण केले असता तेथील उपस्थित सर्व मान्यवर भारावून गेले. या कार्यक्रमामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात या शैक्षणिक उपक्रमाची माहिती प्रसारित करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles