नागपूरकर कवयित्री सविता धमगाये यांच्या लेखणीतून…!!!

नागपूरकर कवयित्री सविता धमगाये यांच्या लेखणीतून…!!!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आनंदाचा क्षण काय असतो. आनंद देणे आणि घेणे काय असते याची प्रचिती काल साहित्यगंध सोहळ्यातील क्षण अनुभवांना आला. राहूल दादा म्हणजे एक अप्रतिम व्यक्तिमत्व. कुठून कुठून गुणीजन शोधून आणून त्यांची एक माळ शिलेदार समुहात ओवली. माळेतील प्रत्येक मोती अप्रतिम, स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य असलेला तरीही शिलेदार रूपी माळेत अलगत शोभणारा.

लातूरला पोहोचल्या बरोबर संग्रामदादांशी भेट झाली. त्यांची आम्हाला सुरक्षित ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्याची धडपड येणाऱ्या प्रत्येकाची अगत्याने विचारपूस कुठेही वैतागलेपणाचा भाव नाही. सतत एक आनंदी हास्य चेहऱ्यावर ठाण मांडून बसलेले. मदतीची सदा तयारी. आम्हाला त्यांनी लातूरदर्शन साठी गाडी उपलब्ध करून ज्यामुळे आम्ही आरामात विविध नैसर्गिक स्थळांचे दर्शन करून वेळेत रेल्वे स्टेशन वर पोहोचू शकलो. संग्राम दादा तूमचे खूप खूप मनस्वी धन्यवाद. या आनंदी सोहळासमयी भेटलेल्या सविताताई एक सुंदर आठवण एक गोड व्यक्तीमत्व.

वैशाली ताईंची कडकडून भेट, लाघवी बोलणे ऐकतच राहावे असे वाटणारे. तारका ताई, सुधाताई, रंजनाताई या तीन दिवसात स्नेहांच्या धाग्यांनी घट्ट बांधल्या गेल्यात. वसुधा ताई, कविता ताई, शिर्के दादा, चौगुले दादा सारेच शिलेदार अप्रतिमच. आ. सुधाकर भूरके सर यांनी मला समुहाची ओळख करून दिली ज्यामुळे मलाही या पुरस्काराचेची मानकरी होता आले. खूप धन्यवाद सर जी. आणि संजयदा काही कारणाने येऊ शकले नाहीत पण त्यांची हूरहूर सारखी *मले का करा लागते* यातून सतत जाणवत राहीली. ते इथे नसूनही इथेच शब्दरूपाने उपस्थित राहीले. या सोहळ्याच्या निमित्ताने लाभलेले सर्व शिलेदार ताई दादा ज्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आणि पुढेही शिकत राहीन.

*आनंदे सोहळा*
*लावला लळा*
*सुटेना गळा*
*सारस्वतांचे मेळा*

हा मेळा असाच फुललेला राहो ही सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते.

सविता धमगाये
नागपूर जि. नागपूर
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles