प्रकाशन समारंभाचा मी साक्षीदार; ‘ज्ञानाग्रज’

प्रकाशन समारंभाचा मी साक्षीदार; ‘ज्ञानाग्रज’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

घालमेल मनाची होती
पोहचता येईल का लातूर
वाढीव सुट्टीचे पत्र येता
झालो मी संमेलनास आतूर

उस्मानाबाद: मराठीचे शिलेदार समूह,नागपूर यांचे यंदाचे दीपोत्सव 2022 प्रकाशन व कविसंमेलन हे लातूर येथे होणार हे जाहीर झाल्यानंतर मला अत्यानंद झाला. नेवासा,औरंगाबाद च्या संमेलनात समुहाच्या अनेक कवी दादा,ताईंचा परिचय झाल्याने पुनश्च एकदा लातूरला सर्वांना भेटता येईल म्हणून मी संमेलनास येण्याचे ठरवले परंतु नियोजित दि.3नोव्हेंबर असल्याने व त्याच दिवशी आमचे दीर्घ सुट्टीनंतर शाळा प्रारंभीचा दिवस येत असल्याने माझा हिरमोड झाला,नोंदणीची मुदत संपत असल्याने आणखी घालमेल होवू लागली,आणि तेवढ्यात वाढीव सुट्टीचे पत्र आल्यावर संमेलनास येण्यास शिक्कामोर्तब झाले.

आदरणीय श्री राहूल दादांच्या वेळेच्या नियोजनाप्रमाणे व श्री संग्राम दादांच्या कुशल आयोजनाने दीपोत्सव 2022व कवी संमेलन कार्यक्रम अतिशय सुंदररित्या वेळापत्रकानुसार संपन्न होत होता,कार्यक्रम स्थळीचे मंगलमय वातावरण पाहून मी भारावून गेलो,मान्यवरांच्या भाषणातून खूप काही शिकण्यासारखे अनुभव गाठीशी आले तसेच नयनरम्य पुरस्कार वितरण सोहळा,कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन असे सर्वच उपक्रम मनोवेधक होते,संमेलनात आदरणीय राहूल दादांनी आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस मनोबल वाढविणारी होती.

आदरणीय सविता ताई, आदरणीय संग्रामदादा, आदरणीय अरविंददादा, नागोराव दादा,हंसराज दादा, भुरके दादा,विजय दादा,राउत सर, मोहिते सर, बळीराम दादा यांच्याशी सुसंवाद साधता आला, माझ्यासाठी लातूर संमेलनात सहभागी झालेला दिवस अतिशय हर्षदायी पर्वणीचा ठरला.

क्षण सौख्याचे लाभता
मन गहिवरून हे आले
अथक परिश्रम घेऊनी
संग्रामदांनी संमेलन सफल केले

दत्ता काजळे’ज्ञानाग्रज’
उमरगा जि.उस्मानाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles