‘ती’ची आस, प्रेमाची जणू साक्षीदार’; स्वाती मराडे

‘ती’ची आस, प्रेमाची जणू साक्षीदार’; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_

“पुन्हा आली गुलाबी थंडी
मना ‘ती’ ची आस लागली’
विझला न तो निखारा
शेकोटी आठवांची पेटली..!”

आज दिवसाने लवकरच रजा घेतली. निशेचे आगमन झाले ते सोबत गुलाबी थंडी घेऊनच..! तुला तर माहीतच आहे ह्या शराबी हवेत.. चांदण्यांच्या दिव्यात मला फिरायला कित्ती आवडते. पावलं घराबाहेर पडलीच..सहज चालता चालता दूरवर नजर गेली.. शेकोटी पेटलेली.. गप्पांचा फड रंगलेला नि सोबत .. मीही कधी त्यांच्यात येऊन सामील झालो माझे मलाही समजले नाही.. बाकी सगळे त्यांच्या गप्पांमध्ये पण, मी हरवलो तुझ्या आठवांत.. लहानपणापासूनच या शेकोटीनं आपल्याला जवळ आणलं.. आणि मोठेपणी प्रेम फुलवतही नेलं‌.. आपल्या प्रेमाची जणू ती साक्षीदार.. नंतरही कुणी सोबत असो वा नसो हिवाळा आला, की तू मी अन् शेकोटी हे समीकरण ठरलेलंच.. एकमेकांच्या खांद्यावर विसावून.. विश्वासाचा श्वास घेतला.. सहवासाचा आनंद लुटला.

कधी कधी ठिणग्यांची फुलेही हसून दाद द्यायची आपल्याला आणि मग हळूहळू शेकोटी शांत होऊन निखारे फुलत रहायचे.. पण आज.. आज मात्र आठवांचा निखारा फुललाय अन् प्रेमाच्या उबेऐवजी विरहाची धग पोळून काढतेय मला.. तू कधीचाच पैलतीर गाठलास.. मी मात्र उभा आहे ऐलतीरावर.. होय या शेकोटी सोबत मला ‘तीची आस लागली.. तिच्या सोबतीची आस लागली.. या दुनियेच्या गर्दीत जेव्हा मी हरवतो.. गर्दीत असूनही कुणीच जवळचा न वाटतो.. नजर शोध घेते खास..असावा वाटतो तिचा सहवास.. मनास लागते ‘ती ची आस..!’

हिवाळा सुरू झाला, की विविध सहलीचा आनंद घ्यायला लोक सज्ज होतात. शाळा काॅलेजांपासून मुले हा आनंद लुटतात. हिवाळी शिबिरांचे आयोजन होते. शेकोटी भोवती फेर धरून नाचगाणी रमतात. साता-याचा म्हातारा ते त्याचा कुत्रा.. कुत्र्याचे शेपूट.. सगळेच शेकोटीला येतात.. आठवलं ना हे शेकोटीचंं गाणं.. लहान मुलांना याची वाटते गंमत तर मोठी मुले गिटार घेऊन आणतात शेकोटी भोवती रंगत.. ही शेकोटी कधी प्रेमाची साक्षीदार होते तर कधी वियोगाचीही.. म्हणूनच तर सिनेसृष्टीत अनेक दृश्यांमध्ये तिला स्थान मिळालंय..तिच्याजवळ अनेकजण गोल करून बसले की भावनांची देवाणघेवाण व्हायला कितीसा वेळ लागतो.. राजकारणातील गप्पांपासून ते घरातील वादसंवादापर्यंत सगळंच येतं त्यात.. कधी कुणी एकटाही बसतो मनातल्या मनात कुढत.. नकळत पापण्या ओलावत.. कळत नाही तेव्हा ती ऊब देते की धग.. कदाचित ऊबच देत असावी मायेची.. आदिमानवाने ठिणगी पाडून पेटवलेली ही शेकोटी आजतागायत ऊब मिळवण्यासाठी सर्वांना हवीहवीशी वाटते.. गुलाबी थंडी, हुडहुडी भरणारी थंडी झाली की लागतेच ती ची आस..!

आज शेकोटीच्या चित्राला अनुसरून ‘ती ची आस’ हा गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेसाठी विषय आला. शेकोटी पाहिली नाही किंवा अनुभवली नाही अशी व्यक्ती नसेलच. कदाचित त्यामुळेच ‘ती’ची आस सर्वांनी लेखणीतून उतरवली खास.. आजचा चित्र चारोळी विषय हा सूचक अर्थाने आलेला. काहीजणांच्या लेखणीतून हा सूचक अर्थही पहायला मिळाला. जे लिहाल ते मनाला स्पर्श करणारे असावे.. भुरळ पाडणारे असावे. नक्कीच लेखणीतून मायेची ऊब मिळेल. असेच लिहित रहा व्यक्त व्हा या शुभेच्छांसह सहभागी सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन.💐

आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक, कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles