‘मानव्य जपाया….काजव्याच्या राती होऊ या….!; वैशाली अंड्रस्कर

‘मानव्य जपाया….काजव्याच्या राती होऊ या….!; वैशाली अंड्रस्करपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे परीक्षण_

आसमंतात पसरलेला काळाकभिन्न अंधार रातकिड्यांची किरकिर…सर्वांचा आवडता चांदोबा दूर दडी मारून बसलायं. मात्र इवले इवले दिवे जणू हवेत तरंगतांनाच भास होतोयं. कुणी म्हणतात त्यास काजवे, कुणी शेणकिडे, इंग्रजी मध्ये Fireflies तर जीवशास्त्रीय संज्ञेत लेपीरेडी या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कीटकांचे वेड मात्र सर्वांनाच…!

पुनरूत्पादन किंवा भक्ष्य शोधार्थ आपल्या शरीरातून प्रकाश बाहेर टाकणारे काजवे स्वयंप्रकाशित असतात. रात्रीचा काळोख म्हणजेच त्यांच्या अस्तित्वाची ओळख असते…काळोखालाही हरवून सौंदर्य निर्माण करता येतं ही त्यांची शिकवण.., सूर्य जरी होता न आले परि काळोखातील काजवा होऊ दे…तिमिराला त्या स्वयंप्रकाशाने भेदू दे…कवीच्या मनात नकळत आलेल्या ओळी म्हणजे काजव्यांचीच प्रेरणा ना…!

काय शिलेदारांनो…वैशालीताईंनी आज काजवेपुराणच सुरू केलंय असं वाटतं ना…? काय करणार ना..शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचा विषयच ‘काजव्याच्या राती’ आणि मी पण बसले आपले त्या काजव्यांशी संवाद साधत‌…!

मराठीचे शिलेदार समूहात आज काजव्याची रात फारच शब्दसाज लेवून आली. काजव्याच्या रातीला आयुष्यातल्या सुखदुःखाची काव्य चारोळीमधून देवाणघेवाण झाली. शक्यतो कवीमनाला आवडतो चंद्र, पौर्णिमेची शुभ्र रात आणि चकोरालाही वेड लावणारे चांदण्याचे झरणे….म्हणूनच कवीवर्य जगदीश खेबुडकर म्हणतात…..

‘पान जागे फूल जागे भाव नयनी जागला,
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला…’

पण जीवनात सारेच दिवस पौर्णिमा असणार नाही. अमावस्येलाही सामोरे जावेच लागणार काजव्यांप्रमाणे स्वयंप्रकाशित होऊन…. स्वयंप्रेरणेने…कारण तथागत गौतम बुद्धांची शिकवणच आहे…

अत्त दीप भव, स्वयंदीप हो
दया धर्म शांतीच्या पथाचा..
पथिक तुझा तूच हो……….
मानव्य जपाया, हो तू मानव आधी
तेवता जळू दे, आसक्तिची व्याधी

सध्या स्वार्थ, आसक्ती, विकृती या दुष्गुणांनी मानवाच्या मनावर अधिराज्य गाजवणे सुरू केले आहे. सध्या चर्चेत असलेल्या श्रद्धा वालकर निर्घृण हत्याकांडाने परत एकदा मानव्य कुठे हरवले हा प्रश्न मनास भेडसावतो आहे. पण होऊयात ना आपण काजव्याच्या राती…मनाला दिलासा देणाऱ्या‌..‌..याल ना तुम्ही आमच्या सोबतीला….?

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles