

अलिबाग काँग्रेसतर्फे राज्यपाल व भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात निदर्शने
अलिबाग: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करून महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब व भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरुद्ध अलिबाग ठिकरूळ नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रायगड जिल्हा काँग्रेस व अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने करण्यात आली. कोशारी चले जाव, कोशारी हाय हाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी ऍड. प्रवीण ठाकूर, चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तालुकाध्यक्ष भास्कर चव्हाण,कविता ठाकूर, ऍड.उमेश ठाकूर, सुनील थळे, जगदीश कवळे, एस.एम.पाटील, महेंद्र महिमकर, संगिता माहिमकर, नीलम शिंदे, वसीम साखरकर, शहानवाज शेरखान, मन्सूर कादरी, समीर पल्लवकर, समद कुर, मुजफ्फर पल्लवकर, मुजाहिद लोगडे, कौस्तुभ पुनकर, ऍड.शैलेश मोकल, ऍड.गणेश पाटील, गजानन टिके, ऍड.सुजय घरत, संजय अनुभवणे, मेघनाथ पाटील, विश्वास म्हात्रे, प्रमोद पाटील, आशिष पाटील, मानस कुंटे, महेंद्र चौलकर, समीर ठाकूर, संदेश शिंदे, विकास पोरे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.