Home गावगप्पा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार प्रकाश पंडित यांना प्रदान

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार प्रकाश पंडित यांना प्रदान

149

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार प्रकाश पंडित यांना प्रदानपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शिक्षण मंत्र्याच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण_

परभणी: स्वातंत्र्यदिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक प्रकाश पंडीत यांना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा “राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” ऐतिहासिक नगरी कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा.ना.दिपक केसरकर यांच्या हस्ते दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदान करण्यात आला.

यावेळी कास्ट्राईब महासंघाचे सचिव मा.नामदेवराव कांबळे साहेब, राज्याचे माजी शिक्षण संचालक मा.महावीर माने साहेब,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्यसरचिटणीस मा.आकाश तांबे साहेब, राज्यकार्याध्यक्ष मा.रविंद्र पालवे साहेब, मराठवाडा विभागीय अध्यक्ष मा.सतीश कांबळे साहेब व राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.