खडतकर कन्ट्रॅकशन कंपनीच्या कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा

खडतकर कन्ट्रॅकशन कंपनीच्या कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_हिंगणा तालुका मनसेची मागणी_

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

हिंगणा : दिनांक २९ /११ /२२ ला वानाडोंगरी शहरात महाजनवाडी बस स्थानक जवळ दोन तरुणांचा दुर्दैवी जागेवरच मृत्यू झाला. रस्त्याचे अपूर्ण कामाबद्दल व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनसे तर्फे अनेकदा निवेदन, आंदोलन करण्यात आले होते. प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता निदर्शने पण देण्यात आले.

कंत्राटदारांनी रोड वरील विद्युत खांब काढून घेतले त्यामुळे अंधारात खड्डे दिसत नाही व अपघात होतात. कंत्राटचा कालावधी दोन वर्षाकारिता होता व 15/03/2021 ला कालावधी संपला तरी वानाडोंगरी टोल नाका पासून रायपूर पर्यंत रस्त्याचे काम अपूर्णच आहे. हिंगणा तालुक्यातील नागरिकांना तारेवरची कसरत करीत, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हिंगणा विधानसभेचे लोकप्रतिनिधी या क्षेत्रात राहत नाही. नागपुरात आलेशान बंगल्यात ते राहतात त्यामुळे येथील समस्याबद्दल त्यांना काहीच देणे घेणे नाही.

कंत्राटदारावर निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा वचक नाही.
म्हणून आज midc पोलीस स्टेशन व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 3 नागपूर ला निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर कंत्राटदार व संबंधित विभागावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा लवकरात लवकर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले. जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या मार्गदर्शनात व त्यावेळी उपस्थित हिंगणा तालुका अध्यक्ष दीपक नासरे, सचिन चिटकुले जिल्हाउपाध्यक्ष, वैभव मुळे तालुका सचिव, निलेश भुरसे, रोशन पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles