युनोत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याकरीता वर्ल्ड पार्लमेंट सर्वतोपरी प्रयत्न करणार – डॉ. ग्लेन टि मार्टिन.

युनोत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याकरीता वर्ल्ड पार्लमेंट सर्वतोपरी प्रयत्न करणार – डॉ. ग्लेन टि मार्टिन.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, प्रतिनिधी

श्रीरामपूर : – जगाच्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के लोकसंख्या भारताची असूनही संयुक्त राष्ट्र संघात भारताला कायम स्वरूपी सदस्यत्व नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उभारणीत भारताचा मोठा वाटा असून भारताला या प्रकारची सापत्न वागणूक मिळणे हा एक प्रकारचा भारतावर अन्यायच आहे. शिवाय मोजक्या पाच देशांना व्हेटोचा अधिकार असल्याने इतर सदस्य देशांचा या संघटनेत समावेश असणे म्हणजे असूनही नसल्यासारखीच अवस्था असल्याचे प्रतिपादन वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन यांनी व्यक्त केले आहे.

श्रीरामपूर येथील खासदार गोविंदराव आदिक सभागृहात वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांनी आयोजित केलेल्या ” वर्ल्ड पार्लमेंट इंटर नॅशनल अवॉर्ड ” च्या वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

याप्रसंगी वर्ल्ड पार्लमेंटचे उपाध्यक्ष प्रा. नरसिंहा मुर्ती यांनी वर्ल्ड पार्लमेंट भारताच्या राज्यघटनेचा सर्वतोपरी आदर, सन्मान व पालन करून आपले मार्गक्रमण करील असे स्पष्ट केले. खजिनदार फिलीस टर्क यांनीही डब्ल्यूसीपीविषयी माहिती दिली. याप्रसंगी दिल्ली चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. राकेश छोकर, महाराष्ट्र राज्य संपादक संघाचे अध्यक्ष श्री प्रकाश कुलथे यांनीही आपले विचार मांडत डब्ल्यूसीपीएच्या कार्याचा गौरव केला.

भारतीय शास्त्रात व धर्मात अनन्यसाधारण महत्व असलेल्या तुळशीला जलार्पण करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. अध्यक्षीय सुचना प्रा.नागेश हुलावळे यांनी तर अनुमोदन प्रा. अरूण सावंग यांनी केले. वर्ल्ड पार्लमेंट सदस्यत्व प्रदान “अर्थ कॉन्स्टीट्यूशन ” या मुळ इंग्रजी ग्रथांच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. कोणत्याही भारतीय भाषेत या संविधान ग्रथांचे भाषांतर करण्याचा मान मराठी भाषेला प्रथम मिळाला. डॉ. दत्ता विघावे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील प्रा.नागेश हुलावळे, डॉ. प्राची बामणे, प्रा. अॅड. तेजल वैती यांनी अनुवादनाचे काम केले. त्यांचाही याप्रसंगी यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३३ पुरूष व १६ महिलांना ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ ” व “वर्ल्ड पार्लमेंट मेंबरशीप ” देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये
सौ.. वसुधा नाईक-(पुणे, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक कार्य) या साठी पुरस्कृत आले. तसेच वसुधा नाईक यांच्या “शब्द फुलांची ओंजळ ” या पुस्तकाचे प्रकाशन तर डब्ल्यूसीपीएच्या विशेष बॅग, पॅड व स्लॅशचे अनावरण करण्यात आले.

आकाशवाणीचे नैमित्तिक उदघोषण प्रसन्न कुमार धुमाळ यांनी मराठीत व प्रा.अॅड. आदिनाथ जोशी यांनी इंग्रजीत सुत्रसंचलन करून कार्यक्रमात बहार आणली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दत्ता विघावे यांच्याशिवाय सचिव प्रा. अरूण सावंग, सहसचिव ऋषिकेश विघावे, खजिनदार चिंतामण भोसले, सदस्य प्रा. अक्षय तेलोरे, पवन लांबोळे, अकबरभाई सय्यद यांनी महत्वाचे योगदान दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles