साहित्य रसिकांचे विनम्र आभार…!; वैशाली अंड्रस्कर

साहित्य रसिकांचे विनम्र आभार…!; वैशाली अंड्रस्करपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सर्वप्रथम महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…🙏🙏🙏 ज्यांच्यामुळे स्त्री शिक्षणाचा हक्क मिळाला. माझे प्रथम गुरू आईवडील यांना सस्नेह वंदन….🙏🙏🙏 ज्यांच्या मुळे गमभन गिरवले ते गुरुवर्य यांना साष्टांग दंडवत…. शैक्षणिक सेवेच्या कारकीर्दीत प्रशासकीय कार्य तसेच लेखनास प्रवृत्त करणाऱ्या माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका, जीवनाच्या प्रवासात लाभलेलं किशोर भोयर सरांसारखं आदरयुक्त मैत्र आणि माझ्या लेखणीला अत्युच्च दर्जाचं व्यासपीठ मिळवून देणारे मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक मा. राहुलदादा पाटील व जिच्या व्यक्तिमत्वावर माझी ‘मोरपीस तू’ ही कविता शब्दबद्ध केलेली आहे ती सवू उर्फ सविता पाटील ठाकरे…या सर्वांना मानाचा मुजरा…!

खरेतर मोरपीस तू….एक आल्हाददायक अनुभूती…हलके, हळुवार, तितकेच सप्तरंगाने विभूषित मोरपीस सर्वांनाच वेड लावणारे. पण अशी अनेक मोरपीसं मानवी रूपात आपल्या अवतीभवती असतात. आपल्या काटेरी जीवनाला सुखद स्पर्श करून जातात. मन मोहरून उठते. आनंदलहरी फेर धरून नाचू लागतात. मराठीचे शिलेदार समूहात अनेक नाती जुळली. काहींशी आदरयुक्त, काहींशी अल्लड..कधी समंजस तर कधी विक्षिप्त…पण प्रत्येक नात्याने मन मोहरत गेलं आणि मेंदू समृद्ध होत गेला…!

अशाच एका रेशमी धाग्याने काळजाशी बांधली गेलेली सवू मला नेहमीच वेड लावते. वयात किती अंतर ते महत्त्वाचे नाही…मने किती जुळतात यावर नाती टिकून असतात….म्हणूनच कदाचित सवू आणि माझं नातं अबाधित आहे. समूहाचे मुख्य प्रशासक मा. राहुलदादांच्या अविश्रांत कार्यात सविता पाटील ठाकरे हिचा बहुमोल वाटा आहे. मिशनरी शाळा, जिजाऊ ब्रिगेड सिल्वासा शाखेची प्रदेशाध्यक्षा, कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळून मराठीचे शिलेदार समूहाची धुरासुद्धा ती समर्थपणे सांभाळते आणि म्हणूनच तिचा आभासी वा प्रत्यक्ष सहवास हा हवाहवासा वाटतो…मोरपीसासारखा… माझ्यासाठी ती मोरपीसच जणू… आणि हे सारेच मी अल्पशब्दांमध्ये गुंफण्याचा प्रयत्न कवितेत केलेला आहे.

ही रचना मान्यवर राहुलदादा पाटील, पल्लवी ताई पाटील,सविता पाटील ठाकरे, अरविंद दादा उरकुडे, अशोकदादा लांडगे,परीक्षक सहप्रशासक संग्रामदादा कुमठेकर, सुधाकर दादा भुरके, यांनी सर्वोत्कृष्ट ठरवून सन्मान केला…हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. आपण मराठीचे शिलेदार समूहाचे सर्व साहित्य रसिक यांनी माझ्या कवितेला कौतुकाचे कोंदण दिले त्याबद्दल समस्त ताई आणि दादा…आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार… वेळेअभावी वैयक्तिक दाद नाही देऊ शकले याबद्दल क्षमस्व… भविष्यातही हाच लोभ कायम असावा ही विनंती…!🙏🙏

✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles