रंगीत खिडकीतून चिमुकल्यांचे भावविश्व साकार

रंगीत खिडकीतून चिमुकल्यांचे भावविश्व साकार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पियुच्या वही’ चा मंचीय अविष्कार_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील “बालरंजन” केंद्र गेल्या 35 वर्षांपासून बाल- कुमारांसाठी ज्ञान व मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तीमत्वं विकासाचे भरीव कार्य करीत आहे. संस्थेच्या स्थापनेचे हे 35 वे वर्ष असल्याने वर्षभर विविध मनोरंजक उपक्रम साजरे होत आहेत. याच उपक्रम मालिकेत नुकताच आयोजित करण्यात आलेला प्रसिध्द कवयित्री संगीता बर्वे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ‘पियुची वही’ पुस्तकावर आधारीत ‘रंगीत खिडकी’ हा मंचीय अविष्कार सादर करण्यात आला.

केंद्राच्या नाट्यवर्गातील २२ मुलामुलींनी पियूच्या घराच्या ‘रंगीत खिडकी’तून दिसणारे सुंदर विश्व उपस्थितांसमोर उलगडले. यातून साकारलेले चिमुकल्यांचे मनोहर भावविश्व उपस्थितांना मनोरंजनाची एक सुंदर मेजवानी देणारे ठरले. बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे संहिता- रूपांतर जयश्री बोकील यांनी केले. दिग्दर्शन देवेंद्र भिडे व सहदिग्दर्शन केतकी डिके यांनी केले. नृत्यदिग्दर्शन केले डॉ. विदुला कुडेकर यांनी.

याप्रसंगी डाॅ. संगीता बर्वे यांचा साहित्य अकादमी पुरस्कारानिमित्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संगीता बर्वे यांनी केद्रांच्या मुलांचे कौतुक करून संस्थेच्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संगीता बर्वे यांच्या ‘झिपरू’ या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

बालरंजन केंद्रात दरवर्षी “भाषेची गोडी” या संकल्पनेवर आधारीत शिबिराद्वारे मुलांवर मराठी भाषेचे संस्कार करण्यात येतात. त्याचप्रमाणे खेळ, नाट्य अभिनय आणि मनोरंजनातून ज्ञानावर आधारीत विविध कार्यक्रमांद्वारे मुलांच्या मानसिक, बौध्दीक व शारीरिक विकास घडवून आणण्याचे कृती कार्यक्रम आखण्यात येतात, अशी माहिती केंद्र संचालिका माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles