युगपुरूष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

युगपुरूष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रुखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: न्यू मून इंग्लीश मिडीयम स्कूल व ज्यु.कॉलेज अर्जुनी मोर .येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक,दलितांचे कैवारी युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आयोजित अभिवादन कार्यक्रमात सचिन मेश्राम, राकेश उंदिरवाडे, तारका रुखमोडे यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण केले व महामानवास अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी भीमगीत गायन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लघुनाटिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले.त्यात चवदार तळ्याच्या पाण्याचा हौद बाबासाहेबांनी कसा खुला केला, शिक्षणात समानतेचे धडे गिरवताना कशा अडचणी आल्या या घटनांचे सादरीकरण अतिशय सुरेखपणे नाटिकेतून साकार करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन मेश्राम यांनी बाबासाहेबांनी सांगितलेला शिक्षणाचा मार्ग प्रत्येकाने अवलंबावा. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वावर चालण्याचा प्रयत्न करावा तरच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल अशे प्रतिपादन आपल्या भाषणातून केले .शाळेतील अध्यापिका लिना चचाणे यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. त्रिवेणी थेर यांनी सूत्रसंचालन केले व हिना लांजेवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश उंदिरवाडे, तारका रुखमोडे, राहुल रुखमोडे, देविदास बांडे, कुंजना बडवाईक,एक प्रतीक्षा राऊत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles