आम्ही साहित्यवारीचे प्रवासी;सुधा मेश्राम

➿➿➿➿🦚🙏🦚➿➿➿➿
*🚩 आम्ही साहित्यवारीचे प्रवासी 🚩*
➿➿➿➿🦚🙏🦚➿➿➿➿पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*😞सर्वात आधी मी आपणा सर्वांची क्षमा मागते…🙏 ‘आम्ही साहित्यवारीचे प्रवासी’ वर्णन हे अर्धवट राहिलेले होते. कारणही तसेच होते. माझे मामाजी म्हणजे (सासरेबुवा) यांना ध्यानीमनी नसताना ही अर्धांगवायूचा झटका आला. औषधोपचार करूनही त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही आणि अवघ्या १५ दिवसांत ते बुध्दवासी झाले…😞 त्यामुळे माझी लेखणी थांबलेली होती… उशिरा का होईना ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा स्वीकार कराल अशी आशा बाळगते…*

*🗣️ कार्यक्रम कुठलाही असो… प्रास्ताविक हा त्या कार्याचा आढावा असतो आणि आत्मा त्या कार्यक्रमाचा आरसा दर्शवितो. मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूरचे विश्वस्त प्रमुख आ. उरकुडे दादांनी माय मराठीच्या सक्षमीकरणासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांची तळमळ… त्यासाठी कशाचीही तमा न बाळगता निस्वार्थ भावनेने केलेली सेवा. नवकवीसाठी एका व्यासपीठाची संधी…लेखणीत प्रगल्भता वाढविण्यासाठी दैनंदिन कविता/चारोळी, चित्रचारोळी, हायकू लेखणीला बोलती करून घुमारे फोडायला लावणारे नवनवीन विषय . बुद्धीला चालणा देणारे अनेक उपक्रम मराठीचे शिलेदार समुहातर्फे राबविले जातात.या आधी दिवाळी विशेषांक ‘काव्यसंवेदना’ , ‘आम्ही काव्यस्तंभ’ प्रातिनिधिक काव्यसंग्रह, ‘आम्ही हायकूकार’ कवितासंग्रह तसेच ‘मायमराठी कविता संग्रह, साहित्यगंध २०२१ अंक , यात आणखी भर पडणारे ते म्हणजे साहित्यगंध दिपोत्सव २०२२ अंक आज या अंकाचे प्रकाशन सारस्वतांच्या समक्ष लातूर या नगरीत अगदी थाटामाटात साजरे झाले.*

*💫 मराठीचे शिलेदार संस्थेच्या सचिव ऍडोकेट पल्लवी ताई पाटील काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाही. परंतु त्यांनी आपल्या मनोगत संदेशांद्वारे आपले मत व्यक्त करतांना म्हटलं की…मायबोलीतील सारस्वतांच्या लेखणीला आदराचे स्थान…त्यांचे जतन करणे म्हणजेच साहित्याचा अनमोल ठेवा म्हणजे आजच्या ‘दिपोत्सव साहित्यगंध २०२२’ अंक होय. भाषेच्या , विचारांच्या, साहित्याच्या या दिंडीच्या आनंदयात्रेत प्रवासी होऊन ती पुढे पुढे अखंड तेवत ठेवण्यासाठी आपले सहकार्य असेच लाभावे. तसेच साहित्याचा अनमोल ठेवा हा मनमुराद, मनसोक्त आस्वाद घेऊन रसिक, वाचक वर्गाना नक्कीच प्रेरक ठरेल अशी आशा बाळगते. जरी त्या शरीराने येथे हजर नव्हत्या; पण त्यांचे मन मात्र येथेच होते. मनाला त्यांची जी उणीव भासत होती ती या मनोगत संदेशातून मराठीचे शिलेदार परिवार आता परिपूर्ण झाला यांचे समाधान मनाला वाटत होते.*

*💐ज्येष्ठ कवी मा. सुधाकर भुरके दादांचे मार्गदर्शन हे शब्द नावेतून किना-याचा तळ गाठणारे… शब्दांची मेजवानी ही सारस्वतांचा ऊर्जास्रोत आणि उत्साह वाढविणारा… तसेच मार्गदर्शक म्हणून बुलढाणा येथील शिवराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नरेशभाऊ शेळके हे गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी ‘शिक्षक पालक समन्वय अभियान’ राबविला. हा अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे यांची दखल ‘यशदा’ पुणे सारख्या राज्यशासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेने घेतली. निस्वार्थ भावनेने सेवा करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. खरंच त्यांची ही कामगिरी हि कौतुकास्पद आहे.*

*शब्दाला गरज असते अर्थाची*
*फुलाला गरज असते सुंगधाची*
*तसेच श्रोत्यांच्या ज्ञानात भर घालण्या*
*आतुरता शेवटच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाची*

*🌸कार्यक्रमाच्या अध्यक्षा.. प्रदेशाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड, सिल्वासा येथील शिवमती सविताताई पाटील मराठी भाषाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्या मराठीचे बोल वाजे काळजात खोल… ओवी मधून पाझरे नित्य अमृताची डोल…माझी मायबोली ही अलंकाराचा साज लेवूनी नटुनथटून येते. जशा नववधूचा मान जसा जिकडे तिकडे असतो, तसाच मान माझ्या लावण्यवती मराठीचाच असून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवित मिरविते. अशी मराठी भाषा ही दैदिप्यमान आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व वाढले आणि आपल्याच राज्यात भाषा ही अडचणीत सापडली आहे. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी…..आपल्याच घरात हाल सोसते मराठी…. म्हणून माय मराठीचे जतन करायचे नाही; तर तिचे आपणा सर्वांनी पोषण करायचे आहे. जोवर साहित्यांच्या वाणीत गोडवा आणि लेखणीत प्राण आहे तोपर्यंत मराठी भाषा अजरामर आहे. म्हणून सर्वांनी हातभार लावायचा आहे. ताई काय ती शब्दाची जादू जी खरोखरच विचार परीवर्तन करायला भाग पाडते… मायमराठीच्या सक्षमीकरणासाठी स्वतः ला झोकून दिलं त्यांचे हे कार्य महान आहे…सलाम त्यांच्या या महान कार्याला…🙏🙏🙏*

*⚜️पहिले संत्र संपताच जेवणास सुट्टी झाली. दूरवरून आलेले शिलेदार एकमेकांशी प्रेमाने विचारपूस करीत मराठवाठ्यातील प्रसिद्ध असलेला ‘निलंगा’ मसाला भाताचा आस्वाद घेतला…काय हो ती जबरदस्त चव…अजूनही ती स्मरणात आहे. सर्व एकत्र मिळून मिसळून जेवणाचा आस्वाद घेतला तो आंनद काही औरच होता. एकमेकांच्या गाठीभेटीने सर्वांचा चेहरा हर्षाने फुलला होता.*

➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles