बुधवारीय काव्यरत्न कविता स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ कविता स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : संवेदना🥀*
*🍂बुधवार : ०७/ डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*संवेदना*

स्रीलाही मन आहे
नका करू तिची अवहेलना
पुरूषांनो तुम्ही जाणून घ्या
तिच्या मनाची संवेदना

फक्त उपभोगाची वस्तू म्हणून
नका बघू हो तिच्याकडे
तिलाही मन भावना आहेत
बदला तुम्ही दृष्टीकोन गडे

तिच्या त्या पदस्पर्शाने
शोभा वाढते घराची
सर्वांची तिलाच काळजी
मूर्ती आहे हो त्यागाची

भुकेली असते ती
तुमच्या दोन शब्द प्रेमाची
अन् तुम्ही काय करता
विटंबना तिच्या देहाची

ती आहे म्हणून तुम्ही आहात
हे कसे बरे विसरता
येथे नाही कुणीच वरचढ
पाळा तुम्ही स्री-पुरुष समानता

दिसताच क्षणी तिचा
आदराने मानसन्मान करा
माणूस म्हणून तिलाही जगू द्या
गगनात मुक्त संचार करू द्या….

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

लग्न करायची होती
मले लयच मोठी हौस
घरी बायको येताच
नशिबावर पडला पाऊस

नव नव होत सार
मले बी वाटली मजा
ऑफिस मधून घेत होत
म्या भरमसाठ रजा

पण एक दिवस तिन
फोडलीच डरकाळी
आणि तवा पासूनच
कडू वाटे मले पुरणपोळी

उठता बसता आता
मारते मले टोमणे
मुक्यावाणी राहून
आयकतो तिचे म्हणे

माया जीवाच्या संवेदना
सांगू तरी कुणाले
आम्ही बी पक्षी त्याच तयातले
जले बी जातो सांगाले

*कुशल गोविंदराव डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

कसे सांगू मी कोणाला
माझ्या वेदनेची संवेदना
सतावतो हा प्रश्न मनाला
उठून सकाळ भेटते देहाला
उन कोवळे ते उन्हाचे
बोलते आहे मनाला
सोबतीला तुझ्या सावलीच्या
तिची सावली दिसत नाही

कसे सांगू मी कोणाला
माझ्या वेदनेची संवेदना
सतावतो हा प्रश्न मनाला
वाटेवरी चालताना एकटे
जपते आता मला वाटही
हात तुझा न दिसता हाती
पुसते मला आत ती वाटही
भेटेल का ती पुढच्या वळणाला

कसे सांगू मी कोणाला
माझ्या वेदनेची संवेदना
सतावतो हा प्रश्न मनाला
न दिसता घरी तू सांजवेळी
तूळशीला ही तो दिवा विचारी
गेलीस कोठे तू या कातरवेळी

कसे सांगू मी कोणाला
माझ्या वेदनेची संवेदना
सतावतो हा प्रश्न मनाला
घरात साऱ्या ओल डोळ्याला
मुकेच वेध साऱ्या घराला
निरव शांतता साऱ्या आठवाना
समाधीस्त झाले तुझ्या प्रेमाला

कसे सांगू मी कोणाला
माझ्या वेदनेची संवेदना
सतावतो हा प्रश्न मनाला
सांगायला तया उत्तर नाही
भरली समई आसवानी
पेटवया त्यात वात नाही
बंधीस्त श्वास वेडे
ऐकावयास तू आज नाही
कसे सांगू मी कोणाला
माझ्या वेदनेची संवेदना
सतावतो हा प्रश्न मनाला

*विजय शिर्के , छ. संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.३० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*संवेदना*

*हे संवेदना…..,*
हल्ली तुझी,
झालीये म्हणे,
बोथट धार…….,
पूर्वी भावाला खरचटले,
तर भावाच्याही डोळ्याला,
लागायची धार…….!
वृद्ध माता-पित्यांप्रती,
जपायचं कुटुंब,
मनात संवेदना……..,
त्यांच्या आजारपणात,
अख्ख्या घरालाही,
व्हायची वेदना……!
फक्त रक्षाबंधनापुरतीच,
नसायची,
मानलेल्या बहिणीचीही माया…,
मानलेला भाऊही,
संकटात असता,
तिच्या सुखाचीही मुरझायची काया..!
हल्ली मात्र,
तू मना-मनांतून,
घरा-घरांतून होते आहेस हद्दपार..,
नातं-नात्यालाच,
तिलांजली देत-देत,
तुला सोडून येतंय सरहद्देपार..!!!

तुला सोडून येतंय सरहद्देपार..!!!

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

दंगली घडवतात
नुकसान कोणाचे
भरपाई देऊन करता
सांत्वन त्यांचे

स्री भ्रूण हत्या करून
स्री जातीलाच नष्ट करता
मग माता,भगिनी,पत्नी
ही नाती का मानता

देशाच्या सीमेवर जवान
अहोरात्र लढतात
पण तरूणांनो व्यसनाधीन
होऊन तुम्ही मजेत जगता

आपल्या गरजेसाठी
वृक्षतोड करतात
पण तुम्हीच जीवसृष्टीचा
अंत करून पाहता

मानवा तू इतका
संवेदना शून्य का झालास
स्वार्थापायी तू किती
निष्ठूर बनलास

*सौ.प्रांजली जोशी ,विरार ,पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿

*सवेंदना*

इवलस माझं बाळ
रडू लागले जोरजोराने
हातातले काम बाजूला ठेऊन
मी त्याच्याकडे धावू लागले
इवलस माझं बाळ
गोदीत खेळू लागले
स्मितहास्य चेर्यावर ठेऊन
मज मन रडू लागले..
इवलस माझं बाळ
जोलीत झुलून
हळू हळू पाय आपटू लागले
मला झोका द्या असं
रडण्याच्या शब्दात सांगू लागले.
इवलसं माझं बाळ
खुदू खुदु हसू लागले
झोका लांब जाऊ लागले

*ज्योती पाटील खोब्रागडे*
*रा.लोणावळा जि पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

भर रस्त्यात जखमी अवस्थेत
विव्हळत पडलेला पाहिला
जागृत झाली मानवी संवेदना
दवाखान्यात नेऊन उपचार केला

का, नाही देखिले कुणीच त्यास
रस्त्याला चालती वाहने क्षणोक्षणी
मृत झाली माणुसकी, मृत झाली संवेदना
जो तो फक्त स्वार्थ बघे या जीवनी

नसता रूधिरमक्त देह तिथे
जर असती नोटा पडलेल्या
किती थांबले न किती उचलले
अर्था मध्ये संवेदना दडल्या

नसती नाती गोती जगती
पैशासाठी सखे सोबती
रडत्या जीवाचे पुसण्या आसूं
संवेदनशील मनच धावती

ताठर झाल्या भावना मानवी
बधिर बोथट झाली संवेदना
दु:खी मनाला घेई जे समजून
राहिली कुठे ती मानवी रचना

प्रेमळ स्पर्श पित्याचा अपुल्या
पेलण्या आभाळ जागवी प्रेरणा
ओले नेत्र मायेचे सांगती
जीवंत अजुनी हृदयातील संवेदना

कळेल का कधी मोल भावनांचे
अर्थावरूनी तोलती सामर्थ्य
सोडता नाती एकटा जगती
तेव्हा कळती संवेदनेचे अर्थ

पैसा अंती येत नसतो
दु:ख मनाचे पुसायला
गहिरे बंध भावनांचे येती
मनातल्या संवेदना जपायला

*कु.संगिता पी.रामटेके*
सडक अर्जुनी गोंदिया
*©सदस्या -मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

पिडलेला समाज सारा
चाचपड होता अंधारात
अधिकाराच्या जाणिवेणे
लढण्या दिला हातात हात

गावकुसाबाहेर होते जग
जीवंतपणाचे नाही लक्षण
जो तो येई तुडवीत जाई
सारे टपले करण्या भक्षण

आम्हीही आहोत माणसे
जगण्याचा आम्हा अधिकार
गर्जले सर्वप्रथम भीमराव
गोलमेज परिषदेत साधिकार

संवेदना जाणिली ज्यांनी
विश्वाने वंदीले त्यांना
हक्कासाठी लढतांना
समर्थन मिळाले ज्यांना

लिहून घटना भारताची
मनूस्मृतीचे केले दहन
संविधान एक हक्क आहे
मनोभावे करावे वहन

समानतेचा हक्क मानवा
देते आपले संविधान
जोवर चालेल देश तयावर
जगात मिळेल खूप मान

*सविता धमगाये*
नागपूर
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

आपल्या वर्तमानात भरू कधीतरी
गतकालीन भावनिक हर्ष क्षणांना
अंतरातील भावना उधाणतील मग
मिश्किल होतील बर मूक संवेदना…

जरी आपण आत्ता मोठे असलो तरी
होवूया न आपण कधी लहान मूल
निरागसतेने आपल्याच मित्रांसवे
मांडूया लहान भातुकलीची चूल ….

लहानपण देगा देवा परत म्हणत
सुगंध लुटूया गंधीत रंगीत फुलांचे
हवे तसे या वसुधेवर मस्त बागडूया
रंग घेवूया आपण फुलपाखरांचे….

चिवचिवणार्‍या चिमण्यांसवे अंगणात
त्यांचे दाणे टिपणं नजरेनं न्याहळूया
त्यांच्याही मनीची संवेदना जाणून घेवू
घरटी चिमण्यांसाठी झाडावर बांधूया…

अंगणात परसदारी झाडेवेली लावूया
मूक पक्ष्यांच्या वेदना जाणून घेवूया
त्यांच्यासाठी अंगणी चारापाणी ठेवू
पर्यावरणाच्या समतोलासाठी तत्पर राहूया…

*वसुधा नाईक,पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना:…….*

काळजात संवेदना बापाच्या
जाण लेका वेदना बापाच्या
हाय खावुन सरणी प्रेत गेले
परत येणेना चेतना बापाच्या !!

ऐक गड्या विनंती बापूची
कर पूर्ण कामना बापूची
अलिप्तांना ही घेवुन सोबती
घ्या सत्याची प्रेरणा बापूची !!

बाप माझा संवेदनशिल होता
धडाडीचा कृतिशिल होता
चारीत्र्यसंपन्न प्रामाणिक
दयाळू क्षमाशिल होता !!

भावनिकतेला आव्हान देणे
हेच जमले भडकावुन देणे
कळल्या ना भावना अंतरीच्या
नैतिकतेची अव्हेलना करणे !!

*प.सु. किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles