बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील विजेत्यांच्या चारोळ्या

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : संवेदना*🥀
*🍂बुधवार : ०७ / डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*संवेदना*

स्त्री म्हणून जन्मा आली
भोगल्या किती वेदना
ज्योतीराव फुलेंमुळेच
जाग्या झाल्या संवेदना….

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :-मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

का जन्मलो आम्ही
संवेदनांची करून माती
काळकोठडीत बंद आम्ही
सांभाळण्यासाठी नाती

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

हरवली,आपली माणसं
बोथट ,झाली संवेदना
संपला, प्रेमाचा ओलावा
उरल्या फक्त रित्या भावना

*मायादेवी गायकवाड (मानवत )परभणी,*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.३० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*संवेदना*

संवेदना म्हणून राहिली ना कुणा
संवेदनशून्य झालीत हल्ली माणसं
कुणाला कशाचे सोयरसुतक नाही
आपापला स्वार्थ साधतात माणसं

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

हरवली आज संवेदना
कुठे राहिली माणसात
कुणाविषयी प्रेम भावना
स्वार्थी भरले लोक जगात

*सौ पुष्पा डोनीवार ,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

ज्यांनी सोसल्या आहेत
खूप सार्‍या वेदना
त्यांना कळती दुसर्‍यांच्या
मनातील संवेदना.

*चव्हाण बी एम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

*दुःखितांच्या यातनांप्रति*
*संवेदना मनीं जागाव्या*॥
*त्यांच्या क्लेशांच्या झळी*
*आपल्या अंतःकरणाला लागाव्या*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*चारोळी—संवेदना*

दुखावलं स्त्री अस्मितेला
असह्य होतात वेदना
दुःखाचं आभाळ फाटतं
आणि मुकं होतात संवेदना

*सौ इंदू मुडे ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना…*

माणुसकीची जपुया नाती,
आपुलकीची लावू वाती,
जाणूनी मन संवेदना,
निर्माण करू हास्य ज्योती…

*साक्षी भोयर गुजरी राळेगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💕🔆💕➿➿➿➿
*संवेदना*

अहंकारात असतो डुबून
नसतात त्याला भावना
हृदय असतो कोरडा
कसे करणार व्यक्त संवेदना

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles