संघर्ष हा साहित्यातून व्यक्त झाला पाहिजे; माजी कुलगुरू डॉ. पठाण

संघर्ष हा साहित्यातून व्यक्त झाला पाहिजे; माजी कुलगुरू डॉ. पठाणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_दोस्ती फाउंडेशन श्रीरामपूर येथे कवी संमेलन संपन्न_

वसुधा नाईक, प्रतिनिधी

अहमदनगर: श्रीरामपूर तालुक्यातील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण लोककलावंत पै.मजनूभाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच व्ही आय पी गेस्ट हाऊस, श्रीरामपूर जि.अहमदनगर येथे संपन्न झाला.

यामध्ये गझलकार सागर निंबाळकर, कवी शैल सुतार , कवी/कलाकार प्रमोद सूर्यवंशी , कवी डॉ. सुशील सातपुते, कवयित्री आशा ब्राम्हणे यांनी बाप या विषयावर कविता सादरीकरण करून कवी संमेलनाची शोभा वाढवली. त्यानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा शास्त्रज्ञ डॉ.एस.एन.पठाण व्यासपीठारून बोलत होते. जुन्या पिढीतील लोककलावंत पै.मजनुभाई शेख हे नाट्यकलावंत ,उत्कृष्ट हार्मोनियम वादक ,गौळणरचिताकार तसेच उत्कृष्ट गायक होते. त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी दोस्ती फाउंडेशनतर्फे सदर पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांस प्रोत्साहन देण्याचे कार्य केले .

यासाठी उत्कृष्ट प्रवासवर्णन, उत्कृष्ट गझलसंग्रह, उत्कृष्ट सुविचार संग्रह,उत्कृष्ट चारोळीसंग्रह, उत्कृष्ट लेखसंग्रह, उत्कृष्ट कादंबरी ,उत्कृष्ट काव्यसंग्रह आणि उत्कृष्ट कथासंग्रह, सुविचार, आत्मकथन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कला,क्रीडा,साहित्य,वैद्यकीय,शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.एस. एन.पठाण कुलगुरू नागपूर विद्यापीठ तथा उच्च शिक्षण संचालक (म रा), उदघाटक मा.बाबासाहेब सौदागर चित्रपट गीतकार, सिनेअभिनेते, मा.वसुंधरा शर्मा सिनेअभिनेत्री, नाट्यकर्मी, साहित्यिक डॉ.वंदनाताई मुरकुटे, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण ,रामदास वाघमारे मुख्य संपादक जीवन गौरव ,रज्जाक शेख अध्यक्ष दोस्ती फाऊंडेशन,सुभाष सोनवणे, आगारप्रमुख राकेश शिवदे , प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे,सुनील गोसावी संस्थापक शब्दगंध , नगरसेविका प्रणिती चव्हाण , नगरसेवक राजेश अलग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कृत पुस्तकास आणि व्यक्तीस आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष रज्जाकभाई शेख, नितीन गायके,नसीर सय्यद, देविदास बुधवंत, सत्तारभाई शेख,आनंदा साळवे,इमाम सय्यद,अमोलभाऊ शिंदे,मिराबक्ष बागवान, बाबासाहेब पवार, राजेंद्र देसाई आणि रजा इलाही ग्रुपच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दोस्ती फाउंडेशनचे पुरस्कार
जीवनगौरव पुरस्कार लक्ष्मीबाई काशिनाथ सोनवणे, अहमदनगर
पत्रकाररत्न दिगंबर भगरे, सोलापूर, भगवान राईतकर मेहकर बुलढाणा,चंद्रकांत वाकचौरे अहमदनगर, संजय व्यापारी औरंगाबाद, संदिप पाळंदे राहुरी,शौकतभाई शेख, श्रीरामपूर
तर आत्मकथन – ‘ आयुष्य उसवताना ‘- भारत कवितके
,समीक्षा ग्रंथ -‘आंबेडकरी जाणींवांचा अक्षरप्रकाश ‘ प्रशांत ढोले वर्धा,ग्रंथ- ‘रंगनाथ तिवारी’ डॉ. दिपक सूर्यवंशी, दिवाळी अंक- ‘निशांत ‘ संपादक-निशांत दातीर संगमनेर,सुविचार संग्रह – ‘ विचारक्षण ‘गणेश कुंभारे, चंद्रपूर,कादंबरी -‘ आठवणी ‘ सायमन भारस्कर, नेवासा,लक्षवेधी कादंबरी – ‘ विस्कटलेली चौकट ‘, मेघा पाटील, बालसाहित्य लेखन पुरस्कार – ” ‘मायबाप ‘अय्युब पठाण,पैठण, काव्यसंग्रह पुरस्कार -‘जगणे इथेच संपत नाही ‘ हणमंत पडवळ उस्मानाबाद, लक्षवेधी काव्यसंग्रह ‘कल्पनेचा चांदवा ‘-सौं कल्पना निंबोकार अंबुलकर औरंगाबाद
लक्षवेधी काव्यसंग्रह काव्यसार ‘-श्रीम.संध्यारांनी कोल्हे उस्मानाबाद, कथासंग्रह पुरस्कार -‘मातीचा देह’ -डॉ. सुभाष कटकदौंड कथासंग्रह पुरस्कार -गोष्ट तिसऱ्या बायकोची -भारत सातपुते, गझलसंग्रह पुरस्कार -गझलछाया -सिराज शिकलगार, सांगली गझलसंग्रह पुरस्कार- हृदयातील सुगंधी जखमा-यशवंत हिराबाई त्रिंबक पगारे, शिक्षकरत्न सौं.अलकनंदा घुगे आंधळे औरंगाबाद, गौसपाशा शेख, पालघर, सौं .रेहाना मुजावर, श्रीरामपूर,सौं सविता कदम, नांदेड, समाजरत्न- सौं.सुनीता वाळुंज सिन्नर,सौं.पंचवटी गोंडाळे नांदेड, शकील गवाणकर रत्नागिरी -सौं.श्वेता सावंत (सिंधुकन्या ) मालवण, ह.भ.प.चंद्रहास गवळी नेवासा,कलारत्न -सौं.वसुंधरा शर्मा सोलापूर, फारुख शेख,सिंदखेडराजा बुलडाणा, दिलावर शेख, साकुर संगमनेर,वैद्यकरत्न -राजेंद्र फंड,तालुका आरोग्य सहाय्यक,राहाता, साहित्यरत्न -सौं.सारिका माकोडे भड, पुणे,सौं.मीना शेळके,संगमनेर, सौं माधुरी फालक,उल्हासनगर,दुशांत निमकर,चंद्रपूर,आदर्श समाजसेवी संस्था,सद्गुरू संस्था,मंगळवेढा सोलापूर आणि बोधी ट्री फाउंडेशन औरंगाबाद यांना पुरस्कार मिळाला. शासकीय विश्रामगृह श्रीरामपूरच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळयानंतर पै. मजनूभाई शेख यांना अनेक कवींनी काव्यातून काव्यआदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत वाकचौरे आणि यशोदा पांढरे यांनी केले तर आभार नितीन गायके यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles