गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : अश्रूच्या वेदना🌤️*
*🔹गुरूवार : ०८ / १२ /२०२२*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अश्रूच्या वेदना*

अश्रूच्या वेदना
कळतील तुला कशा ?
बोधट संवेदना
पाषाणहृदयीच जशा

✍️ *श्री.संग्राम कुमठेकर,लातूर*
*©️ सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

भासू लागतात जेव्हा अश्रूच्या वेदना
तेव्हा ठेवावा ताबा स्वतःच्या मनावर
जीवन म्हटले तर दुःख तर येणारच
लक्षात असावे याचा परिणाम ना होणार कोणावर

*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रुंच्या वेदना*

पाषाण हृदयी माणसांना
कळतील कशा संवेदना
ज्यांच्या हृदयी असे भावना
तोच जाणी अश्रुंच्या वेदना

*प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर*
जि. चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.३० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿

*अश्रूच्या वेदना*

ना विसरता आल्या…..
ना परत देता आल्या…..
आठवणीच त्या कारण …..
अश्रूच्या वेदनेला झाल्या….

*शेख शाहीन रियाज*
भिवंडी,ठाणे
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

नर असो वा नारी
पशु असो वा प्राणी
होते जेव्हा घाव मनी
अश्रू च्या वेदना पाझरते नयनी

*सौ, वनिता गभने आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

डोळ्यातून केवळ पाणी वाहते
कळत नाहीत अश्रूच्या वेदना,
पिळवटून निघते अंतःकरण
जाणून घ्याव्या मनाच्या संवेदना.

*दिनकर श्रीपती पाटील*
खोची जि कोल्हापूर
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूंच्या वेदना*

अश्रुंच्या वेदनांचे
मोल न कळे कुणाला…
घाव असतात ते अंतरीचे
जे दुःख देती जीवनाला

*सौं. वंदना राजेंद्र सोरते*
*जि. गडचिरोली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

अश्रूच्या वेदनेला होऊ दया मोकळे
जवळच्या व्यक्ती जवळ मन करा मोकळे
जीवनात सुखदुःख पाहुणे असतात आगळेवेगळे
संकटाला वाट लावून व्हा त्यातून मोकळे.

*श्री सत्यवान शहारे*
*अर्जुनी मोर. जिल्हा गोंदिया*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

नयनातून वाहते आनंद अश्रू
डोळ्यातून घरंगळते दुःखाश्रू
पाण्याच्या रूपात तरळतात
हर्षासोबत क्लेष ही देतात

*वसंत गवळी गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

आजकालच्या तरूणपिढीत
संवेदनाच हरवलेली आहे
कशा कळतील अश्रूच्या वेदना
कारण मनच मृत अवस्थेत आहे

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

जया हरवल्या संवेदना
तया कळेना अश्रूच्या वेदना
अंतर्मनातील जानाव्या
इतरांच्या नाजुक भावना

*गोधणे प्रकाश पुंडलिक*
शिवाजी नगर औरंगाबाद
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

भाव मनीचे जाण ना
दूर राहुनी विरह सोसवेना.
सांग कळणार तुला कधी
सख्या अश्रूंच्या वेदना.

*सौ.जयश्री पंकज मराठे, नाशिक*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

साथ सुटता मैत्रीची
झाल्या अश्रूच्या वेदना
सारे सहन करता
हरवल्या संवेदना

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समुह सदस्य*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना*

डोळ्यातूनी वाहती ओघळ
होऊनी अश्रूच्या वेदना
रिते होते मन
व्यक्त करता भावना

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😞🌈😞➿➿➿➿
*अश्रूच्या वेदना…*

ह्रदयाच्या‌ तळ्यात अश्रूच्या वेदना
मुक्याने झिरपत राहती आसवात
अबोल भावनांचे दाग सोलत
बसतात कोवळ्या अधीर मनात .

*सौ.सविता वामन ठाणे.*
सदस्या कवियत्री लेखिका.
*©मराठीचे शिलेदार समूह.*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles