Home कोकण साव कलार समाज संस्थेचे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन संपन्न

साव कलार समाज संस्थेचे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन संपन्न

93

साव कलार समाज संस्थेचे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील साव कलार समाजाची आमसभा व समाज स्नेहसंमेलन नुकताच श्री संत रविदास सभागृह नागपूर येथे मोठ्या उत्साहात व समाज बंधू भगिनींच्या प्रचंड उपस्थितीत आनंदात पार पडले.

कार्यक्रमाध्यक्ष मा. सुनिलभाऊ खराटे , उद्घाटक मा.ललीतभाऊ समदूरकर , प्रमुख अतिथी मा.दिपकजी जयस्वाल , विशेष अतिथी मा. किरणभाऊ चिलात्रे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी , राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित कलार समाजाचे लोकप्रतिनिधी , सामाजिक, शासकिय व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर , खेळाडू , इत्यादींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ दिपप्रज्वलन तसेच मनस्वी उजवणे हीने सादर केलेल्या गणेश वंदन नृत्याने झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. बलराम काकपुरे यांनी करतांना संस्थेची वाटचाल व उपक्रमांचा मागोवा सादर करून यापुढे युवकांना कार्य करण्याची साद घातली. याप्रसंगी कलार समाज सचिव कृष्णा उजवणे यांनी तयार केलेली नागपूर समाज बांधवांची इत्यंभूत अद्ययावत माहितीची कौटुंबिका 2022 चे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंगणघाट येथे खेळण्यास जात असलेल्या नागपूरच्या 4 टिमला संस्थेच्या वतीने 24000 रुपयांची प्रोत्साहन राशी प्रदान करण्यात आली. सर्व सन्माननिय अतिथींनी उपस्थितांना यथोचित , बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. उत्कृष्ट स्वादिष्ट भोजनानंतर पहिले सत्र संपले. या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत बासोडे व कु. वैष्णवी भामकर यांनी केले. तर आभार ॲड. केशव काकपुरे यांनी व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रात युवक युवती परीचय कार्यक्रम , मुलांचे मनोरंजनपर , सांस्कृतिक कार्यक्रम , खेळ व बक्षिस वितरण कार्यक्रम आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संचलन सौ. भारती मावळे व श्री शशांक डगवार यांनी केले. संस्थेच्या उपविधीनुसार निवडणुक कार्यक्रम मुख्य निवडणुक अधिकारीओंकारराव बिहाडे साहेब, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत शंकरपुरे व यादवराव मावळे यांनी पार पाडला.

मावळते अध्यक्ष डॉ. काकपुरे यांनी आजपर्यंतच्या कार्याकरीता अमुल्य सहकार्य व समाजबांधवांच्या अतुट विश्वासाप्रति आभार व्यक्त करून उत्तराधिकारी म्हणून डॉ. अभय शेंडे यांचे नाव सूचवले .बहुतेकांनी त्यास उत्स्फूर्त अनुमोदन दिले. इतर नावे सूचविण्या करीता निवडणूक मंडळाने कालावधी देऊन सुद्धा दुसरे नाव न आल्याने नागपूर साव कलार समाज संस्था नागपूरच्या अध्यक्ष पदावर एकमताने डॉ.अभय शेंडे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष करून डॉ. अभय शेंडे यांचे अभिनंदन केले. किशोर मेहता यांनी केलेल्या सर्वांप्रतीच्या आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.

मेळाव्याकरीता वर्धा , अमरावती, चंद्रपूर , भंडारा , गोंदिया , यवतमाळ, अकोला, बुलढाणा मुंबई , पुणे, औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष / प्रतिनिधी व नागपूर शहर तथा जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व सन्माननिय अतिथी तथा उपस्थित समाजबांधवानी कार्यक्रमाचे व्यवस्थापन , भोजन व एकूणच सर्वांग सुंदर व्यवस्थेचे मुक्त कंठाने कौतुक व स्तुती केली. एकमेकांना भेटीचा आनंद , समाधान , दुरावलेल्या नात्यातील साधलेली जवळीक , नविन परिचय, समाजाच्या प्रगती करीता मेळाव्यात झालेले विचारमंथन व समाजाच्या एकोप्याचा संदेश घेऊन समाजबांधव सायंकाळी ७ वाजता आनंदी मनाने घरी परतले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तन मन धनाने कार्य करणारी नागपूरची युवा टिम , उत्साही कार्यकर्ते , महिला समिती , सर्व समाजबांधव , सर्व सन्माननिय अतिथी , सर्व दानदाते देणगीदार , जाहिरातदार , संस्थेचे आदरणीय मार्गदर्शक , कार्यक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या एकूणच सर्वांचे मनःपूर्वक अनंत आभार. कृष्णा उजवणे, किशोर मेहता, घनशाम मकासरे, मोहन बिजवार , वर्षा गणोजे, वसंत पातुर्डे , नम्रता उजवणे , अनिता भामकर , सुधाकर धामंदे , जयदिप नायसे , पुरुषोत्तम धामंदे, देवेंद्र जरोदे, निखील काकपुरे, प्रफुल्ल डगवार , श्रुती उजवणे, सानिका काकपुरे, श्रेया उजवणे, वेदांती माणिकपुरे, सुरज राऊत, शुभम भामकर, हेमंत धामंदे, राजेंद्र भामकर, ओमप्रकाश टाकळकर , अमित सावळे , तन्मय भामकर , मंदार पहाडे, आयुष बिजवार , वेदांत धामंदे, सौरभ उजवणे, विनय काकपुरे , युवा फौंडेशन चे सर्व युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.