

नागपूर भा.ज.यु.मोच्या सहमिडीया प्रमुखपदी वेदांत संजय जोशी
नागपूर: भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर कार्यकारणी मध्ये वेदांत संजय जोशी यांची सह मीडिया प्रमुख पदावर शहर अध्यक्ष पारेंद्रजी पटले यांनी नियुक्ती केली. याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके, माजी महापौर संदीपजी जोशी, भाजप मंडळ अध्यक्ष किशोरजी वानखेडे, भाजप प्रदेश सदस्य राजीवजी हडप ओमप्रकाशजी (मुन्ना) यादव, भाजप उत्तर भारतीय आघाडी शहर अध्यक्ष सुरेंद्र पांडे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश महामंत्री शिवानीताई दानी वखरे,भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष निलेशजी राऊत सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी वेदांत संजय जोशी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. वेदांत संजय जोशी यांनी सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.