
यूरोलॉजिस्ट डॉ.जयंत निकोसे यांच्या शिबिराचे आयोजन संपन्न
_सुयोग नगरात युरीन आणि किडनीच्या तपासण्या करून १५० च्या वर घेतला, नागरिकांनी शिबिराचा लाभ_
नागपूर: सुयोग नगर येथे रविवारी जय भीम गार्डन ग्रुप्स, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, व इंटास, लुपिन या फार्मा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क यूरोलॉजी हेल्थ चेकअप शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर महात्मा फुले उद्यान सुयोगनगरात आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुधीर शंभरकर (अध्यक्ष महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम) प्रमुख उपस्थिति. डॉ. बलदेव रामटेके, मुख्य मार्गदर्शक व नागपूर शहराचे प्रसिद्ध डॉ.जयंत निकोसे युरोलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट सर्जन, उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.जयंती निकोसे यांनी रुग्णांना किडनी व यूरिनच्या प्रोस्टेट बद्दल माहिती दिली.
रोजच्या जडणघडणीच्या जीवनात होणाऱ्या बदलामुळे व खान पिण्याच्या वेळेवर अनियमित्तामुळे किडनी आणि युरीन मास पेशीच्या व ग्रंथीच्या समस्या तयार होत असतात. आणि त्याकरिता स्वतःच्या शरीराकडे माणसाने जर बरोबर लक्ष दिले तर कुठलीच समस्या उद्भवणार नाही अशा प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या शिबिर च्या माध्यमातून केले. व त्याच प्रकारे रुग्णांची तपासणी सुद्धा करण्यात आली. यावेळी शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सर्वांनी हेल्थची तपासणी करून घेतली. यात किडनी स्टोन, लघवी बंद होण्याचे कारण, थांबून थांबून लघवी होणे, वारंवार लघवी येणे, लघवी जळजळ होणे, लघवीतून रक्त जाणे, तसेच लघवीचे युरोफ्लोमिटरी मशीनच्या द्वारे चाचणी, मोफत तपासणीच्या माध्यमातून निदान करण्यात आले.
या शिबिरात जवळपास दीडशे च्या वर नागरिकांनी आपल्या युरिन आणि किडनीच्या तपासणी करून शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेतला. या शिबिरात यशस्वीरित्या विजय निकोसे, गौतम कांबळे, राजकुमार गोंडाने, दिलीप सूर्यवंशी, दिलीप निमस्कर, उमास्थ गजभिये, मिलिंद डांगे, ईश्वर नगराळे, एकनाथ मून, अशोक पाटील, उमेश गोंडाने, धरमदास गणवीर, योगेश शेंडे, शरणात कांबळे, नागेश बुरबुरे, नंदागवळी, सचिन खोब्रागडे इत्यादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिबिर संपन्न झाले असून कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे संचालन धर्मेश फुसाठे तर आभार डॉ.जयंत निकोसेचे प्रसिद्धी PRO ओपूल तामगाडगे यांनी मानले.