

नागपुरात CBI ची मोठी कारवाई; इन्कम टॅक्सच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक
नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात CBI ने मोठी कारवाई केली आहे. या कारावई अंतर्गत सीबीआयने इन्कम टॅक्स अर्थात आयकर विभागाच्या नऊ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तब्बल चार वर्षापासून CBI या प्रकरणाचा तपास करत होती. अखेरीस अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
परीक्षा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या उमेदवारांनी डमी उमेदवार परीक्षेत बसवून स्टाफ सिलेक्शनमधू नोकरी मिळवली. याप्रकरणी 9 आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे. 2012 ते 2014 दरम्यान ही परीक्षा झाली होती. 2018 मध्ये प्रकरणचा या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. तपासाअंती पुरावे सापडल्याने अखेर 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
अटक झालेले सर्व कर्मचारी आयकर विभागात स्टेनोग्राफर आणि एमटीएस या पदावर 2014 पासून कार्यरत होते. या संदर्भात 2018 मध्येच सीबीआयने प्रकरण दाखल केले होते. त्याच प्रकरणाचा तपास पूर्ण करत आयकर विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना सीबीआयच्या अँटी करप्शन अटक केली आहे.