विदर्भस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर 21 रोजी

विदर्भस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर 21 रोजीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक आ. महादेव जानकर साहेब हे बुधवार दिनांक 21 डिसेंबर 22 रोजी, “जवाहर विद्यार्थी गृह सिव्हिल नागपूर ” येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास अनमोल मार्गदर्शन करणार आहेत असे रासपचे विदर्भ अध्यक्ष प्रा.ऍड रमेश पिसे यांनी प्रसिद्धी पत्रlत म्हटले आहे.

हे प्रशिक्षण शिबीर 3 सत्रांत होणार असून मुख्य मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री आ.महादेव जानकर करणार असून राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भात बळकट करण्यासाठी कार्यकत्यांशी हितगुज साधणार आहेत. या सत्राचे अध्य्क्ष काशिनाथ (नाना ) शेवते तर उदघाटक हरिकिशन (दादा ) हटवार, स्वागताध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे, प्रमुख उपस्थिती कुमार सुशील, बालसायेब लेंगरे, गोविंदराम शुरनर, ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, गोपाळ भारती, अरुण गाडे,सुष्माताई भड उपस्थीत राहणार आहेत.

दुसरे सत्रांत उद्योग व्यवसाय मार्गदर्शन होणार असून खादी ग्रामउद्योगाचे भारत सरकार आयोगाचे संचालक राघवेंद्र महिंद्रकर व रासपचे राष्ट्रीय संघटक पंडितराव घोळवे अनमोल मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष कृषी सम्राट राजेंद्र पाटील राहणार असून प्रमुख उपस्थिती संजय रामटेके, राजन कुर्वे, मुखरोजी ओगेवर आहेत.

तिसरे सत्रांत कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचे आधुनिक तंत्रज्ञानlचे मार्गदर्शन रासपचे सोशल मिडिया समन्वयक नितीन शेंडगे आणि प्रा. हरीश येरणे करणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष डॉ. अनंत नासनूरकर तर प्रमुख अतिथी अनिलकुमार ठवरे, डॉ. प्रदीप पाथुर्डे, प्रेम महेशकर उपस्थीत राहणार आहेत.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून संजय कन्नावार, ऍड. वसुदेव वासे, पुरुषोत्तम कामडी, प्रा.शाम अणे, रमेश शेमबेकर, लक्ष्मण रोकडे, अनुप यादव, संध्याताई शेट्टे, दिनेश भोंगाडे, दिपक तिरके, अमोल काकड, अतुल भुसारी आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रक्षिक्षण शिबिरास विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे असे जाहीर आवाहन विदर्भ अध्यक्ष प्रा. ऍड.रमेश पिसे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles