
“वर्षारंभ”
जेव्हा आभाळ दुःखाचे
कोसळते चहूकडून
गर्भारलेल्या धरणीला
सूचत नाही कुणीकडून
दावे तोडून गाय जशी
धाव घेते गच्च रानात
हरवलेल्या वासराला
शोधते पानांपानात
विजय सत्याचा होताना
कधी कधीच दिसतो
असत्याने बरबटलेला
चेहरा मात्र समोर वसतो
भयभीत वाघ सिंह येथे
लपतात गुहेत गपगुमान
कारण माजलेले आहे
सर्वत्र लांडग्याने रान
कोंडतोय रे श्वास मातेचा
सारख्या विकासाच्या बाता
ओळखा ना टाहो तिचा
काय पक्क्या वाटेवरून जाता
जमवली खूप माया भोवती
जोडली संपत्ती अफाट जरी
खायला हवेच असते अन्न
ताटात भाजी भाकरीच बरी
नविन वर्षाचा नवा संकल्प
फुलवून निरागस हास्य ओठी
निष्पाप बालके राहती बघा
फक्त पाण्यावर उपाशी पोटी
जपूया बालमने राहू आनंदे
वर्षारंभ पूर्ण करून इच्छा
जाऊ द्या आता डिसेंबरला
सर्वाना नववर्षाच्या हृदयस्थ शुभेच्छा
सविता धमगाये नागपूर
जि. नागपूर