“वर्षारंभ”

“वर्षारंभ”



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

निरोप देत सरत्या वर्षाला
सूर्यबिंब बुडते आहे..
पलिकडे नवे स्वप्न उद्याचे
याच धरेला पडते आहे..

टिपून घेत स्मृतीगंध कालचे
नाते घट्ट जडते आहे
रोज नव्याने काहीतरी
नव्या पळाला घडते आहे..

कवेत घेत स्वप्नपंखी झेप
फुलपाखरू उडते आहे
कठोर यत्ने प्रयत्न मनूचे
आता कुठे उजाडते आहे ..

आव्हानांना घेत अंगावर
पिढी नव्याने लढते आहे
रंग नव्याने नव्या उषेचे
लालीमा नभाला चढते आहे

जीवासाठी देत जीवाला
सैन्यदळही लढते आहे
सामर्थ्य आमुचे शतकानुशतके
कणाकणाने वाढते आहे

वर्षारंभ उद्याचा दहा दिशांनी
उजळून प्रभा येत आहे
शुभारंभ नवसंकल्पांचा
पुन्हा नव्याने होत आहे

संगीता पांढरे
इंदापूर, जि.पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles