तू पुन्हा येणार..?

तू पुन्हा येणार..?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कोरोना ,
तू पुन्हा येणार का रे..!
कशासाठी येतोस..?
गोरगरिबांचा जीव घ्यायला
कि, डॉक्टरांचे व्यवसाय लक्झरी
सेवेत चालण्यासाठीच तू येतोय..!

कोरोना ,
तू आला की जसा
प्रलय येतो या धरतीवर
जसे त्सुनामीत सापडलेल्या
आणि खवळलेल्या सागरातूनी
मार्ग मिळत नसतंय जहाजाला

कोरोना ,
तुला माहीत आहे ना रे
तुझ्या येण्यामुळे काय होतंय
कुठे कामधंदा मिळत नाही ,
व्यवसाय बुडतोय लहानांचा
तेव्हा काय करायचे या लोकांनी

कोरोना ,
तुला काय सांगायचे ?
बेकारी आणि नोकरीबद्दल
तर माहिती आहेच ना..!
कसं जगायचं रे गरीबांनी ,
सुशिक्षित बेरोजगारांनी आणि
कसं जगायचं ..त्या वयोवृद्धांनी

कोरोना ,
खरं सांग ना ..!
तू ठराविक वेळीच असा
येण्याचा आग्रह का धरतोस ?
लहान हट्टखोर मुलांसारखा जसे
पाहुणचाराला कोणी जातात तसे

कोरोना ,
बस्स झालेय… पाहिलंय..!
तुझा तो भयंकर रुप..पुरे आता
नको रे दाखवू कुणाला
जगू दे बिचा-या गोरगरिबांना
माता भगिनींना वयोव्रुध्द नागरिकांना

चंदू डोंगरवार
अर्जुनी मोर, जि गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles