“सावित्रीच्या लेकी”

“सावित्रीच्या लेकी”पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चला अभियान यशस्वी करूया
जिजाऊ ते सावित्री सन्मानाचा
शिक्षणाने स्वयंसिद्धा बनवुनी
वाढवू मान सावित्रीच्या लेकींचा ||

प्रेरणा जिजाऊंची घेऊन स्वप्नांना
साकार करण्यासाठी होऊ तयार
आत्मसन्मान व मनोधैर्य वाढण्यास
ज्ञान माऊली सावित्रीचा घेऊ विचार ||

आम्ही सावित्रीच्या लेकी शिक्षणाने
होणार स्वयंपूर्ण,आत्मनिर्भर
महाराष्ट्र कन्या आम्ही लढण्यास
अन्यायाविरुद्ध सदोदित तत्पर ||

प्रज्ञा,शील,करूणेची शिकवण
दिली स्त्री उद्धार कर्त्या बाबांनी
सक्षमपणे जगण्याची संजिवनी
दिली आम्हां क्रांतीज्योती सावित्रींनी ||

सावित्रीच्या लेकी आम्ही ना हरणार
प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणार
सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हा
पावलोपावली आम्ही वाढवणार……
पावलोपावली आम्ही वाढवणार…… ||

दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि. उस्मानाबाद
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles