
वर्ष 2023
नवे वर्ष,नवे संकल्प
असतात सर्व नवे नवे
आनंदाच्या क्षितिजावरती
उडतात स्वप्नाची पाखरे
झाले गेले विसरून
होऊ या सारे बेधुंद
पानाफुलांच्या संगीतात
स्फुरले मुक्तछंद
बासरीचे सूर कानी पडती
कोठे ‘डीजे’चा झगमगाट
उमेद घेऊन आली किरणे
2023 च्या नववर्षात….
सरली निराशा,उरली आशा
करू या पंचपक्वानांची तयारी
भरभर सारी वर्षे जाता
हुरहुर वाटे भारी
प्रत्येक दिवस नांदून जावा
संकल्पपूर्तीचा आनंद घ्यावा
हेच मागणे आणि गाणे
प्रत्येक मनामनाचे….
आनंदाच्या क्षितिजावरती
उडतात स्वप्नांची पाखरे
सीमा वैद्य
वरोरा जि. चंद्रपूर