

“वर्षारंभ”
अलवारसे गीत छेडत
स्वप्नांचे नव पंख लेवूनी
वर्षारंभ हा हसरा आला
प्रकाशलेल्या दिशांमधूनी
पर्णांकित ऋतू-वेलीवरी
फूल जसे अलगद फुलले
दिशादिशांतूनी वर्ष नवे
मधुगंध होऊनी दरवळले
मनामनातची नवोन्मषांनी
उधाण आले संकल्पांना
जुन्या नव्याला संगे गुंफूनी
जपूया मनी प्रेमभावना
मानवतेचे दीप लावूनी
विश्वशांतीचा करु गजर
सुखस्वप्नांच्या पू्र्तीसाठी
प्रयत्न करू अष्टौप्रहर
नष्ट करण्या भेदाभेद हे
मनी दृढ निश्चयची करूया
जीवनाचे सोने करण्या
हर्षाचे हे वाण वाटूया
वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली, जिल्हाः सांगली
=========