Home गावगप्पा न्यू मून शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

न्यू मून शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

44

न्यू मून शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा तारका रूखमोडे

स्थानिक अर्जुनी/मोर न्यू मून इंग्लीश मिडीयम स्कूल व ज्युनिअर काॅलेज अर्जुनी/मोर.येथे ..अनंत अडचणींवर मात करत स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या व मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या शिक्षिका, भारतीय समाज सुधारक, स्त्रीवादाची जननी, प्लेग पिडितांची अविरत सेवा करणाऱ्या,रूढीचे पहाड फोडून आभाळ पेलणाऱ्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने प्राचार्य सचिन मेश्राम व प्रा.तारका रुखमोडे व प्रा. राकेश उंदिरवाडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले व याचे औचित्य साधून वेशभूषा स्पर्धेचे व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अकरावीची विद्यार्थिनी कुमारी विद्या मस्के हिने सावित्रीबाईंच्या वेशभूषेत पूर्वीची स्त्री व आताची स्त्री यावर आपल्या वक्तृत्व गुणकौशल्याने प्रकाश टाकला. तसेच त्रिवेणी थेर यांनी सावित्रीबाई फुलेंविषयी माहिती सांगितली, तारका रुखमोडे यांनी सर्व बालिकांना शुभेच्छा दिल्यात.

अशाप्रकारे बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश उंदीरवाडे , तारका रुखमोडे, लिना चचाणे ,कुंजना बडवाईक ,प्रतीक्षा राऊत, शीला बोरीकर, हिना लांजेवार, देविदास बांडे यांनी सहकार्य केले.