
कु.शौर्या पवार हिची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी करिता निवड
प्रा तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया: तालुका विज्ञान मंडळ पंचायत समिती अर्जुनी/मोर.च्या वतीने दिनांक 5 व 6 जानेवारी 2023 रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये जी.एम.बी हायस्कूल अर्जुनी/ मोर. ची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. शौर्या ओमप्रकाशसिंह पवार हिने माध्यमिक गटातून विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभाग नोंदवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
आयोजित विज्ञान प्रदर्शनी ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या मुख्य विषयासह ‘हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट विथ करंट’ या विषयावर आधारित ‘प्रिझर्वेशन ऑफ डीएनए फोर फ्युचर बाय फ्रोजन आर्क’ हा प्रोजेक्ट प्रदर्शनी मध्ये प्रदर्शित केला सद्यस्थितीत वातावरणीय बदल किंवा अन्य कारणांमुळे काही प्राणी अथवा वनस्पती लुप्तप्राय होत आहेत अशा प्राण्यांचे डीएनए पेशी वा बियाणे भविष्याकरिता राखून ठेवण्याची प्रक्रिया याबाबत विश्लेषणात्मक माहिती देऊन तालुक्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
तिचे मार्गदर्शक शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व पालक वृंद यांनी भरभरून कौतुक केले. भावी यशस्वीतेकरिता न्यु मून स्कूल परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.