धन्य ती मॉ जिजाऊ

धन्य ती मॉ जिजाऊपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

धन्य ती माऊली धन्य ते छत्रपती शिवाजी राजे
त्रिभुवनात माय लेकरांची जोडी शोभे
जय जय शिवाजी राजे जय थोर जिजाऊ…

छत्रपती शिवाजी राजे हे अवघ्या मराठी मनांची शान. यांच्या कर्तृत्वाचा विचार केला तर ते महाराष्ट्राच्या चौकटीत मावणार नाही. अशा या गुणवंत शीलवंत श्रीमान योगी थोर राजाला जिने घडविले ती जिजाऊ भारतीय संस्कृतीत सर्वश्रेष्ठ महान ठरली. ‘पुत्र व्हावा ऐसा राजबिंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ अशा या महान पुत्राला घडविणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी जिजाऊंनी खूप कष्ट घेतले. शिवबाच्या व्यक्तिमत्त्वाला नीतिमत्तेची झळाळी जिजाऊ जिजाऊंच्या संस्कारातूनच मिळत गेली. जाधव भोसले यांच्यात वैमनस्य असताना अशा जाधवांची लेक भोसल्यांची सुन झाली.

त्याकाळी मराठ्यांच्यात आपापसात वाद आणि त्यामुळे असलेल्या दौलतीची धूळधाण होत होती. आणि याचा फायदा घेऊन मुघलांनी आपल्यावर हुकूमत गाजवणे या साऱ्या परिस्थितीत त्या अस्वस्थ होत. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर त्यांनी मनात एक ध्येय बाळगले. त्या छोट्या बालकात त्यांनी स्वराज्याची स्वप्न पाहीले. आणि ते सत्यात उतरवले. त्या शिवबाला म्हणत, *शिवबा इथे अनंत अत्याचार होत आहेत. गरिबांना कोणी वाली उरलेला नाही.अन्याय, अत्याचार, लुटालूट करणाऱ्यांवर निर्बंध घालण्यासाठी आता कुणातही हिम्मत उरलेली नाही. त्यासाठी आता तूच यांचा रक्षण कर्ता हो. त्यांचा कर्ता, त्राता आणि उद्धार दाता व्हावं असं मला खूप वाटतं. एवढेच बोलून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी शिवबाला घडवताना एक निर्भय कुशल सर्वांना आपलंसं करून घेणारा संन्यस्त वृत्तीचा नेता बनवणं हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलं होतं
हे राज्य माझे नाही तर हे राज्य श्रीं चे आहे इतकी अलिप्तता त्यांच्यात रुजवली.

अशा या थोर मातेची एकच इच्छा. स्वराज्याचे तोरण बांधणारा राजा माझ्या शिवबाने व्हावे. छत्रपती शिवाजी राजांना नेहमीच प्रेरणा प्रोत्साहन देताना, सर्वधर्मसमभाव, धार्मिकता, मानवता या सर्व गुणांना त्यांच्या मनात रुजविण्यासाठी राम कृष्णांच्या कथा सांगताना ज्या प्रदेशात आपण राहतो तिथली ती जनता साधी भोळी असून जीवाला जीव देणारी आहे तेव्हा त्यांना आपलंसं करून घे. तेच तुला स्वराज्य स्थापण्याच बळ देतील. तुझ्यावर तुळजा भवानी आईची कृपा आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत.

राज्य मिळवायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी शिवरायांना युद्धासाठी आवश्यक असलेले शिक्षण लहान वयातच दिले. आणि वेळ येताच हा आपला सुपुत्र त्यांनी रयतेला बहाल केला. संकटांना न डगमगणे, कणखर होऊन निर्णय घेणे या जिजाऊंच्या कुणाचा वसा घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवबाला छत्रपती शिवाजी राजे म्हणून झालेला राज्याभिषेकाचा सोहळा जिजाऊंनी पाहिला आणि त्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी त्या अनंतात विलीन झाल्यात. अशा या जगन्मातेला शतश: प्रणाम..!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles