Home गावगप्पा मी विद्यार्थी

मी विद्यार्थी

19

मी विद्यार्थीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मी विद्यार्थी अखंड
शिकणे माझा धर्म
नाविन्यपूर्ण संधी
शोधणे हेच मर्म ||

प्रयत्न माझा एक
असे ज्ञानग्रहणाचा
मंत्र जाणतो आज
मी स्वयं अध्ययनाचा ||

मी विद्यार्थी लाडका
माझ्या गुरु जनांचा
ध्यास एकच मजला
सर्वांगीण शिक्षणाचा ||

मी विद्यार्थी होईन
शिकून आदर्शवत
आत्मसन्मान वृध्दी
वाढवेल माझी कुवत ||

मार्ग सत्याचा चालता
भविष्य सुकर घडेल
मी विद्यार्थी जिज्ञासू
नाते अभ्यासाशी जडेल…..
नाते अभ्यासाशी जडेल…..||

दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि. उस्मानाबाद
===