महाकालीनगर चौक येथे राजमाता माँ जिजाऊ जयंती साजरी

महाकालीनगर चौक येथे
राजमाता माँ जिजाऊ जयंती साजरीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंगरोड महाकाली नगर चौकात माँ जिजाऊ डेअरी च्यावतीने किशोर पवार यांच्या अध्यक्षतेत राजमाता, माँ जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे गजानन शेळके व दक्षिण नागपूर भाजपचे वार्ड अध्यक्ष (क) बाबारावजी तायडे यांच्या हस्ते माँ जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

डेअरीचे मालक किशोर पवार यांनी जिजामातेवर आपले विचार मांडले ते म्हणजे जिजामातांनी शहाजी राजे यांच्या खांद्याला खांदा लावून परकीय आक्रमणांना तोंड दिले. ती म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजामाता जाधव घराण्यात असून भोसल्यांच्या घराण्यात गेल्या. जिजाऊ मातेचा जन्म 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा, बुलढाणा येथे झाला. जिजाऊने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी शहाजीराजे भोसले यांच्या सोबत विवाह झाला. संभाजी आणि शिवाजी असे दोन पुत्र होते. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. मातेने शिवबा ला पराक्रमी बनवले आणि आज ते जगजाहीर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते. माँ जिजाऊ पराक्रमी, धाडसी, स्वाभिमानी, असून जनतेच्या उद्धाराकरिता राजसत्ता मिळविण्याकरिता शोषित, पीडित, समाजाला न्याय देण्याकरिता, जिजामातेने आपले संपूर्ण आयुष्य घातले. म्हणूनच राजमाता राष्ट्रमाता ठरल्यात. असे पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी मातोश्री जिजाऊंच्या प्रतिमेला प्रामुख्याने उपस्थित राहून सर्वांच्या हस्ते आंदराजली वाहिली. कार्यक्रम यशस्वीरित्या प्रमुख पाहुणे गजानन शेळके, किशोर पवार, गजानन गायकवाड, दीपक खेडकर, बाबाराव तायडे, देवराव प्रधान, प्रशांत पवार, आशिष काळे, विजय पवार, शाहू पवार, सुभाषराव माने, मोतीराम सिरसाम, लविश बिनेवाले, हेमंत वाघाडे, चंदूमामा व दिनकर गोतमारे, राजु वाघाडे, मडावी साहेब तसेच शिवशक्ती महिला मंडळामध्ये चंदा किशोर पवार, सही पवार, संचिता बेसरवार, ज्योती गायकवाड, साक्षी हिंगे, मंजू कांदे, सुवर्णा नंदुरकर, मंजुषा गायधने, ज्योती शेलोडे, कविता आष्टीकर, निकिता जाधव, अनिता वाघाडे, हर्षा माने आणि अबोली घडोले यांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles