तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोपपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शहादा नंदूरबार :-शहादा तालुक्यातील पाडळदे येथील वल्लभ विद्या मंदिर येथे शहादा तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप सोहळा नुकताच वैज्ञानिक वातावरणात पार पडला.

शहादा तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व वल्लभ विद्यामंदिर पाडळदे आणि शिक्षण विभाग पंचायत समिती शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2022 23 समारोप व बक्षीस वितरण सोहळा अध्यक्ष दत्तात्रय सोमजी पाटील यांचा तसेच प्रमुख पाहुणे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी गट शिक्षण अधिकारी डी. टी. वळवी यांचा अध्यक्षतेखाली पार पडला.

अध्यक्षीय भाषणातून रमेश चौधरी ज्येष्ठ संचालक यांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वैज्ञानिक क्षेत्रात वाढ करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी विज्ञान शिक्षकांनी नवनवीन प्रयोग करावेत व नंदुरबार जिल्हा प्रगतीच्या दिशेने कशी वाटचाल कळेल या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण करून अवगत करावे तसेच वैज्ञानिक सी.व.रमण यांचा कार्याची माहिती दिली व संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाळेचे कौतुक करून गुणगौरव केला व ज्येष्ठ संचालक रमेश चौधरी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

गटशिक्षणाधिकारी डी.टी. वळवी यांनी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेल्या विद्यार्थी शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले तसेच बक्षीस वितरण शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी डी.टी. वळवी विस्तार अधिकारी ममता पटेल व तावडे सर यांच्या हातून करण्यात आले परीक्षक म्हणून प्राध्यापक विषयी डोळे प्राध्यापक पी व्ही साळुंखे जावळे , मनोहर मिस्त्री वासुदेव पाटील,श्रीमती वंदना पाटील यांनी काम पाहिले. प्राथमिक गटातून प्रथम नील प्रशांत पाटील शेठ व्हि. के.शहा विद्यामंदिर शहादा सुभद्रा शिरीष कुमार पाटील व्हॅलंटरी प्राथमिक महिला मंडळ शहादा,द्वितीय अन्वी संदीप लोखंडे महावीर इंग्लिश मीडियम शहादा आदिवासी राखीव गटातून पुनम एकनाथ ठाकरे परिवर्धा हायस्कूल माध्यमिक गटातून प्रथम चिन्मय सोनार महावीर इंग्लिश शहादा पृथ्वीराज पवार वसंतराव नाईक शहादा द्वितीय नेहा रवींद्र पाटील वल्लभ विद्यामंदिर पाडळदा तृतीय ममता पटलारे, सती गोदावरी म्हसावद शिक्षक गटातून गोपाळ गावित जि.प. शाळा वैजाली प्रथम रंजना किरण पटेल माध्यमिक विद्यालय धामळदा, कैलास भगवान नांद्रे आश्रम शाळा कोचरा, चेतन मधुकर शिंदे जि.प. शाळा कलमाडी , श्री गणेश नरोत्तम पाटील उपशिक्षक वल्लभ विद्यामंदिर पाडळदा यांना विविध गटातून प्रथम पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमाला शहादा तालुक्यातून विविध शाळांचे मुख्याध्यापक तसेच शाळेचे सचिव डॉक्टर विलास पटेल, संचालक अशोक पाटील, यशवंत पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी ममता मॅडम, तावडे साहेब, माळी साहेब, केंद्रप्रमुख दिलीप कोंडे, शहादा तालुका मुख्याध्यापक संघटनेचे सचिव जगदीश पाटील, शहादा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव भाई, लक्ष्मीकांत पाटील, शरद पाटील, सैंदाणे सर,हजर होते. प्रास्ताविक शहादा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव पाटील यांनी केले सूत्रसंचालन चतुर पाटील यांनी केले आभार शिक्षण विस्तार अधिकारी तावडे यांनी मानले कार्यक्रमाला वल्लभ विद्यामंदिर पाडळदे शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील ,पर्यवेक्षक अंबालाल चौधरी तसेच ज्येष्ठ शिक्षक विश्राम पाटील, महेंद्र पाटील, चतुर पाटील, गोपाल विसावे, दिव्या पाटील, भरत पाटील,भुपेंद्र पाकळे,गणेश पाटील, तुषार पाटील,अमृत चौधरी,धर्मेंद्र कुवर, अरविंद पटेल, राजू वसावे,मनीषा दाभाडे, मल्हारराव ठाकरे यांनी दोन दिवसीय शहादा तालूका विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले .

तसेच आदर्श प्राथमिक शाळा पाडळदा मुख्याध्यापिका सुनंदा पाटील,नलिनी पाटील,योगेश सोनार, अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले.तसेच शिक्षकेतर कर्मचारी छगन पवार,वैभव पाटील, जितेंद्र पाटील, योगेश पाडवी व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम करून कार्यक्रमाला सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles