घरांगण

घरांगण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुझ्या आठवणींचे
असे प्रेमाचे आंदण
तुझे पाऊल पडता
सजतसे घरांगण||१||

तुझ्या आगमनाने
सुंदर फुलतील फुले
चैतन्याने कसे पहा
घरचे अंगण खुले||२||

मायबापाची लाडकी
वाट पाहतेय अंगण
चाहूल येण्याची लागता
बघ सजले घरांगण||३||

आजही आठवते मज
अंगणातील बालपण
पाखरे उडूनी जातील
तेव्हा वाटते सुनेपण||४||

लेकीच्या आठवणीत
बाप अंगणात बसतो
लेक माहेरी येण्याची
आवर्जून वाट पाहतो||५||

विनायक कृष्णराव पाटील
जि.बेळगाव, कर्नाटक
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles