‘अनुभवी ‘चकवा’ आणि आपण’; सविता पाटील ठाकरे

‘अनुभवी ‘चकवा’ आणि आपण’; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*खरंतर माझंच मला हसू येत होतं. कशी असतात ना माणसे….*
*एक मैत्रीण म्हणून मी तिची गरज केली, काही पैसे उसनवार दिलेत. परतीचा तिने दहा दिवसाचा वायदा केला. पण जवळपास दहा महिने झालेत.. ना पैसे परत आलेत ना ती मला पुन्हा भेटली….त्या दिवशी जरा पावसाची लगबग होती मी घाईत घरी येत होती* *अचानक ती समोर आली…मला जरा बरे वाटले. पण छत्रीच्या आड तिने मला दिलेला चकवा…. मी कधीच विसरणार नाही.*

*हल्ली आपणही समाजात पाहतो अगदी सहजपणे हातावर तुरी देऊन चकवा देणारे काही कमी नाहीत….* *पण पूर्वी जेव्हा रस्त्यांचे जाळे नव्हते, तेव्हा खास करून जंगलात चकवा हमखास चकवायचा. सगळीकडे झाडेच झाडे मग रस्ता कसा सापडणार* ???
*मग आपण त्या चकव्याला* *अंधश्रद्धेत बंद करून घेतले कुणी त्याला भूताने झपाटलेले म्हटले तर कुणी म्हटलं त्याला बाहेरची बाधा झाली….*

*खरंतर दऱ्या, खोऱ्या, डोंगर, झाडी, वाटमारी याला पूर्वीपासून मनुष्य घाबरतच होता.* *मनावर प्रचंड ताण घेऊन तो प्रवासासाठी निघायचा त्यात तो हमखास वाट चुकायचा.सर्वत्र जंगल असल्याने विस्मरण व्हायचं, यालाच रानभूत किंवा चकवा असेही म्हणतात.*

*असा हा चकवा आपण दोन अर्थाने वापरू शकतो*
*बेमालूम पणे समोरच्याला फसवून पुढे जाणे म्हणजे चकवा देणे होय. तसेच चकवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी आणि विशेष कालावधीसाठी झालेला भ्रम होय.*

*पूर्वी भूतानं झपाटलं म्हणजे चकवा दिला किंवा चकवलेस असे राजरोसपणे म्हटले जायचे…*
*आज तर भूताच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकला आहे तेव्हा चकवा तर दूरच.*

*चक्रवाक पक्षालाही चकवा म्हणूनही संबोधले जाते.* *तसं पाहता चकवा तत्सम नवा शब्द देण्यामागे मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा राहुल सरांची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे.* *धाटणी बाहेरचा शब्द येताच आपण कार्यतत्पर होतो, वाचतो, त्याला सोपं करण्याचा प्रयत्न करतो .यानिमित्ताने आपला शब्द भांडारही वाढतो व नवं काही केल्याचं मानसिक समाधानही लाभतं. म्हणजेच चकव्याचा अनुभव आपण घेत असतोच.*

*साधारणतः पंचवीसशे वर्षे जुना इतिहास असलेल्या मराठी भाषेला आज खरी गरज आहे ती* *संवर्धनाची आज हाच विचार डोळ्यासमोर ठेवून बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी राहुल सरांनी चकवा हा विषय दिला.*
*अन् काव्य रसिकांच्या लेखणीला जणू उधाणच आलं.*
*खूप खूप छान काव्य अविष्कार पाहण्यास मिळाला ..*

*जीवनाच्या वाटेवरी*
*चकवा का लागला*
*दैवाने माझ्यासाठी*
*हा डाव कसा मांडला..*

*मग समाजाने दिलेल्या चकवा असो की कर्माला काबुत आणण्यासाठीचा चकवा देणाऱ्या प्रियसीची कान उघडणी असो की तिने चकवा देऊ नये म्हणून केलेलं अर्जव असो* *साऱ्यांनीच खूप सुंदर शब्दफेकीने मन जिंकून घेतले.*

*दारूच्या पेल्यात बुडल्यावर जीवनाची होणारी वाताहत मनाला स्पर्शून गेली.* *भूताप्रतीच्या चकवाने काहींना झपाटले तर काहींनी स्वतःला सा प्रयत्न केला.*
*असो एकंदरीत चकवा सारखा नवा विषय देवून कवी कवयित्रींना* *ज्ञानसागरातील शब्दरूपी मोती शोधण्यासाठी तत्पर बनवण्याचा उद्देश निश्चितच सफल झाला तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन वाचत रहा लिहित रहा व्यक्त होत राहा आणि मराठी भाषेला समृद्ध करण्यात खारीचा वाटा उचला हेच आवाहन…*

सविता पाटील ठाकरे
सिलवासा
मुख्य परीक्षक कवयित्री लेखिका सहसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles