
माता पालकांचा ‘हळदीकुंकू समारंभ’ उत्साहात
सोलापूर: जि. प.प्राथ .शाळा डोंगरगाव येथे “मकर संक्रांत” या पारंपारिक सणाचे औचित्य साधून आमच्या शाळेतील माता पालकांचा’ हळदीकुंकू समारंभ’ गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा विविध स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल गौरव आणि सत्कार त्याचबरोबर मौजे ग्राम डोंगरगाव ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच ,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा शाळेतर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला .
उपस्थित मातांना वैद्यकीय आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवेढा शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ सौ. प्रीती शरद शिर्के मॅडम या उपस्थित होत्या .त्यांनी सर्व महिलांना आणि किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आमच्या शा.व्य.समिती अध्यक्ष .श्री .प्रा .डी. साखरे सर पूर्णवेळ उपस्थित होते. उपस्थित जवळजवळ 75 महिला भगिनींना संक्रांतीचे वाण म्हणून सुगंधी अगरबत्ती पॅकेट देण्यात आली.