
लातुरात पहिले बालसाहित्य संमेलन २४ जानेवारीला
_बालकांना बाल कवितांची मेजवाणी मिळणार_
प्रा.कल्याण राऊत, प्रतिनिधी
लातूर: अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्था,लातूर यांचे आणि बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ लातूर यांचे संयुक्त विद्यमाने पहिले बालकुमार साहित्य संमेलन लातूर येथे दि.२४ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी आयोजित करण्यात आले आहे.
आयोजित संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रकाश घादगिणे आणि केंद्रिय कार्यकारणी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा पुणे अध्यक्ष राजन लाखे सर उपस्थित राहणार आहेत. अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था कार्यकारणी अध्यक्ष रमेशजी चिल्ले, सचिव नागनाथ कलवले, उपाध्यक्ष वृषाली पाटील, कोषाध्यक्ष प्रा.कल्याण राऊत, आणि सर्व कार्यकारणी मंडळ लातूर यांनी आयोजन व नियाोजन केले.
या संमेलनामधून बालकुमारांसाठी कथाकथन आणि बालकवितांचे कवीसंमेलन मुख्य आकर्षण ठरणार आहे. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी भारतजी सातपुते लातूर हे असणार आहेत.