
पुणे दर्शन
पुण्याला गेले होते मुलाखतीला जेव्हा
हर्षले मन शिक्षणाचे माहेरघर स्पर्शूनी तेव्हा
मुलाखती नंतर पुणे दर्शन करण्याचे ठरले
पोटाची आग विझवण्या मिसळपाव खाल्ले
सारसबागेतील कमळाचे फूल लक्ष वेधून घेती
तळ्यांनी वेढलेली छोटी टेकडी, हिरवेगार गवत शेती
शनिवार वाड्याची गंमत बघता भारी
आजही रूबाबात उभे इथे पेशवे सारी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात
भाविकांचे लक्ष लागले सारे दर्शन करण्यात
थाटात उभा आज ही तो नानावाडा
पडक्या अवस्थेत मी पाहिलेला भिडेवाडा
जिर्न होत चाललेल्या पुरातन इमारती
दुसरीकडे गगनाला भिडणारी प्लॅट रचती
राजा दिनकर केळकर संग्रहालय जतन इतिहासाचे
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टंस लॅर्निंग रूप विज्ञानाचे
भारतरत्न JRD टाटा उडाण पुलाखाली
चिकनरोल पदार्थ खाण्याची मजाच आली….
शेवटचे जेवण त्या राजपूत हॉटेलात
लज्जतदार मेजवानी गिळले सारं फुकटात
गाण्याच्या भेंड्यांची रंगोली खेळताना
डावावर डाव मीच सदैव हारताना
हातात हात घालून पुण्यनगरी फिरले
या सुंदर प्रवासाचे वर्णन सारे इथे स्मरले
सारिका डी गेडाम, चंद्रपूर