
जाऊ माळरानी
चल ना सख्या ,
थोडं माळरानी जाऊ
तुझ्या माझ्या भेटीचं
एक झाड तिथे लावू
आठवण आपल्या मैत्रीची
खोलवर जपून ठेऊ
एकमेकांपासून दूर गेलो
तर माळरानी झाडामध्ये पाहु
ओसाड हे माळरान
होईल उद्या हिरवे
निस्सीम आपल्या मैत्रीचे
जग पण गाईल ना गोडवे !!
दगडात लपलेली छोटी फुले
देतील धन्यवाद तुला नि मला
मोठया झाडांचा रूपात
मायेचा आधार हवाय त्यांना
चल सख्या माळरानी जाऊ
तुझ्या माझ्या आठवणींचं
एक झाड तिथे लावू
वाढेल हळू हळू ते झाड
जरा धीर ठेऊ
मैत्रीच्या खत पाण्यानं
माळरानी नंदनवन फुलवू
अनेक व्याख्या मैत्रीच्या
मात्र ,आपली निराळीच
सामाजिक बांधिलकी
ही प्रत्येक नात्यात हवीच
सीमा वैद्य
वरोरा,जि. चंद्रपूर