
किती वाट बघावी
आसमंती रात निळी
सखे याद तुझी आली
निळ्या नभात चांदवा
चमकती चांदणवेली
तरंगते मन आज गं
अंबरीच्या झुल्यावरी
येशील का सांग अता
झुरतसे मी अंतरी
किती वाट बघावी मी
सखे सांग तूच आता
तुझ्या विना व्याकूळ
मी क्षण एक युग भासता
तू ललित रागिणी
झंकारसी मम अधरांवरी
नवरसमय कामिनी
असोशी दाटे माझ्या उरी
कुंतलावरी चमकती तुझ्या
चांदण फुले गं किती
गात्रागात्रांतून अशी
फुलून आली गं नवती
नयनांनी पिऊन घेऊ
चैतन्यची विश्वातले
रात्रीच्या पुष्कोशीचे
स्पर्श हे गंधाळलेले
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हाः सांगली